घरमहाराष्ट्रभाजपकडून काँग्रेस-सेना आमदारांना ५० कोटींची ऑफर; वडेट्टीवार यांचा आरोप

भाजपकडून काँग्रेस-सेना आमदारांना ५० कोटींची ऑफर; वडेट्टीवार यांचा आरोप

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना भाजपने ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

राज्यात सत्ता स्थापन करण्याचा निर्णायक क्षण जवळ येत असल्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांना गळाला लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना भाजपने ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आमदारांशीसुद्धा भाजपचे काही मध्यस्थी संपर्क करत असून सत्तेचा घोडेबजार भाजपकडून केला जात असल्याचा पुनरुच्चारही वडेट्टीवार यांनी केला. दरम्यान, काँग्रेसचे खासदार हुसैन दलवाई यांनी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना येणारे फोन रेकॉर्डींग करावे, असे सांगितले आहे. एकूणच सत्ता स्थापन करण्याच्या शेवटच्या काही तासांमध्ये घोडेबजाराला सुरुवात झाली असून फडणवीस सरकार वाचवण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे ‘वर्षा’वर दाखल झाले आहेत. गुरुवारी संध्याकाळी भिडे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र, पक्षप्रमुख मातोश्रीवर नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.

याविषयी खोसकर यांनी खूलासा केला असून काही मध्यस्थी व्यक्ती आपल्या घरी आले होते. परंतु, बाहेर असल्याचे सांगत त्यांना परतावून लावले. कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नसल्याचा खूलासा खोसकर यांनी दै.‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केला.

- Advertisement -

कोण आहेत खोसकर?

नाशिक तालुक्यातील नाईकवाडी येथील रहिवाशी असलेले हिरामण खोसकर हे अडीच वर्षांपूर्वी गोवर्धन जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील काँग्रेसच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे खोसकर यांनी राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणूकीत गावित यांचा पराभव करुन खोसकर हे काँग्रेसचे जिल्हातील एकमेव आमदार झाले आहेत.

काही मध्यस्थी व्यक्तींनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची भेट मी घेतली नाही. या व्यक्ती कोणत्या पक्षाच्या होत्या, हे आत्ताच मला सांगता येणार नाही. काही कामानिमित्त मुंबईला जायचे आहे, असे सांगत होत्या. त्यावरुन आपल्याला अंदाज बांधता येतो की हे कशासाठी आले असावेत. परंतु, कोणत्याही परिस्थितीत मी पक्षाशी प्रतारणा करणार नाही.
-हिरामण खोसकर

असा घोडेबजार भाजप कधीही करणार नाही – प्रवीण दरेकर

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी विजय वडेट्टीवार यांचा आरोप खोडून काढला आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक ते संख्याबळ मिळवण्यासाठी प्रत्येक पक्ष हा हालचाली करत असतो. काही आमदारांच्या संपर्कातही असतो. मात्र, संपर्क केला याचा अर्थ प्रलोभनं दाखवून कोटींची उडाने केली असे होत नाही. अशी जर कुणी ऑफर देत असेल तर ते चुकीची आहे आणि असा घोडेबजार भाजप कधीही करणार नाही, असे दरेकर म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव असेल तरच बोला – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -