घरमहाराष्ट्रदेशात धर्मांधतेचा कहर, निष्पापांचा बळी घेण्याची मालिका सुरूच - नसीम खान

देशात धर्मांधतेचा कहर, निष्पापांचा बळी घेण्याची मालिका सुरूच – नसीम खान

Subscribe

काँग्रेस आमदार नसीम खान यांनी धर्मांध शक्तींच्या वाढत्या हल्ल्यांवरून सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

‘दुस-यांदा सत्तेवर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सबका साथ सबका विकास म्हणत जनतेला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र एका महिन्यातच पुन्हा एकदा मॉब लिंचिंगच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळं मोदींच्या जुमलेबाजीचा आणखी एक नमुना समोर आला आहे. बिहारमधील जमशेदपूर येथे तबरेज नावाच्या एका युवकाचा सनातनी धर्मांधवाद्यांनी बळी घेतल्याची घटना समोर आली आहे. मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी काँग्रेसच्यावतीनं मागणी करतो’, अशा शब्दांत काँग्रेसचे आमदार आणि विधिमंडळ उपनेते नसीम खान यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते विधानसभा परिसरात पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले नसीम खान?

‘तबरेज हा पुणे येथे कामाला होता. तो ईदनिमित्त त्याच्या मूळ गावी गेला असता त्याला सनातनवाद्यांनी ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’चा नारा देण्याची सक्ती केली. केवळ सक्तीच न करता धर्मांध जमावाने त्याला एका खांबाला बांधून जबर मारहाण केल्याची बाब समोर येते आहे. त्यानंतर त्याला स्थानिक रूग्णालयात दाखल केले असता तो मरण पावला आहे. याबाबतची सर्व चौकशी सीबीआयमार्फत करण्याची माझी मागणी आहे. मात्र या घटनेने पुन्हा एकदा मॉब लिंचिंगच्या मालिकेत खंड पडला नसल्याचे दिसून येत असून धार्मिक शक्तींचा उन्माद वाढत आहे. याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असून हे सरकार पुन्हा सत्तेवर येताच धर्मांध व्यक्तींचा उन्माद पहायला मिळतोय. त्यामुळे अशा व्यक्तींवर कारवाई करावी आणि धर्मांध शक्तींना त्वरीत आळा घालावा’, अशी मागणी यावेळी नसीम खान यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -