जेव्हा आमदार सतेज पाटील बच्चे कंपनीकडून भाजी विकत घेतात…

काँग्रेसचे विधान परिषद आमदार सतेज पाटील यांनी चक्क बच्चे कंपनीच्या भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी खरेदी केली.

Maharashtra
आमदार सतेज पाटील भाजी विकत घेताना

एरव्ही गृहिणीची भाजी घेण्यासाठी भाजी मार्केटमध्ये लगबग असते. मात्र एका आमदाराने चक्क भाजी विकत घेतली. हे आमदार महोदय दुसरे तिसरे कुणी नसून, काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि माजी मंत्री सतेज पाटील आहेत. काँग्रेसचे विधान परिषद आमदार सतेज पाटील यांनी चक्क बच्चे कंपनीच्या भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी खरेदी केली. साधारण एक आठवडा पूर्वीचा हा व्हिडिओ असून यामध्ये आमदारसाहेब चक्क भाज्यांच्या किंमतीत बार्गेनिंक करताना दिसत आहेत. सोबतच मुलांना पैसे देताना त्यांची गणिताची चाचणी देखील ते घेत आहेत.

इतर वेळी कधी भाजी खरेदीला जायला मिळत नाही, पण आज या चुये गावामधील अंगणवाडीतील मुलांच्या आठवडी बाजारात भाजी खरेदी करायचा मोह टाळता आला नाही. अशा उपक्रमांमुळे उद्योग धंद्याला लागणारे बाळकडू या मुलांना शाळेतच मिळत आहे याचा आनंद वाटला. यातूनच उद्याचे शेतकरी उद्योजक घडतील याची खात्री वाटते.

Posted by Satej D. Patil on Tuesday, March 5, 2019

 

उद्योग धंद्याला लागणारे बाळकडू या मुलांना शाळेतच

इतर वेळी कधी भाजी खरेदीला जायला मिळत नाही, पण आज या चुये गावामधील अंगणवाडीतील मुलांच्या आठवडी बाजारात भाजी खरेदी करायचा मोह टाळता आला नाही, असे सांगत अशा उपक्रमांमुळे उद्योग धंद्याला लागणारे बाळकडू या मुलांना शाळेतच मिळत आहे याचा आनंद वाटला. यातूनच उद्याचे शेतकरी उद्योजक घडतील याची खात्री वाटते असल्याचे सतेज पाटील यांनी सागितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here