घरमहाराष्ट्रमुंबईत १४ नोव्हेंबरला काँग्रेस-राष्ट्रवादी जागावाटप बैठक

मुंबईत १४ नोव्हेंबरला काँग्रेस-राष्ट्रवादी जागावाटप बैठक

Subscribe

या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आघाडी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.

नगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ९ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची आघाडी आणि जागा वाटप या संदर्भात विचार करून योग्य निर्णय घेण्याच्या उद्देशाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी १४ नोव्हेंबरला (बुधवारी) मुंबईत महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते आणि स्थानिक पातळीवरील प्रमुख नेते उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस आणि निरीक्षक श्यामराव उमाळकर यांनी स्थानिक नेत्यांना दिली आहे.

हेही वाचा – स्म़ृती इराणींच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन

- Advertisement -

१३ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्जास सुरूवात

महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून १३ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छूक उमेदवारांनी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून उमेदवारी अर्ज दाखल करावा, अशी सूचना उमाळकर यांनी दिल्याचे शहर ब्लॉकचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले. १४ नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या या महत्वपूर्ण बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आघाडी आणि जागा वाटप या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, निरीक्षक उमाळकर, आमदार डॉ.सुधीर तांबे, युवा नेते डॉ.सुजय विखे यांच्यासह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी दीप चव्हाण, बाळासाहेब भुजबळ यांना निमंत्रित करण्यात आले आहे.


हेही वाचा – मराठा पाठोपाठ धनगर आणि मुस्लिम आरक्षाणासाठीही राष्ट्रवादी आग्रही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -