घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात जंगलराज सुरु आहे का?; खर्गे यांचा सरकारला संतप्त सवाल

महाराष्ट्रात जंगलराज सुरु आहे का?; खर्गे यांचा सरकारला संतप्त सवाल

Subscribe

सरकार, प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे आणि निवडणुक आयोगाच्या डोळेझाक करण्यामुळे भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचा मतदारसंघात नंगानाच सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जंगलराज सुरु आहे का?, असा संतप्त सवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारला केला आहे.

‘साकोली विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून सत्ता आणि पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरवापर सुरु आहे. तसेच सरकार, प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे आणि निवडणुक आयोगाच्या डोळेझाक करण्यामुळे भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांचा मतदारसंघात नंगानाच सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जंगलराज सुरु आहे का?, असा संतप्त सवाल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारला विचारला आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गे?

‘मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आणि साकोली मतदारसंघातील भाजप उमेदवारांचा जवळचा व्यक्ती मतदारांना पैसे वाटप करत असताना एक कोटीच्या रकमेसह रंगेहाथ पकडला गेला. त्याच्याकडे मतदारांना वाटण्यासाठी तयार केलेली पैशाची पाकिटे सापडली आहेत. भाजप उमेदवारावर काँग्रेस कार्यकर्त्यांना जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. तिथे कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असणारे पोलीस बघ्याच्या भूमिकेत आहेत. तर निवडणूक आयोगाचे अधिकारी तिथे फिरकत देखील नाहीत. भाजप उमेदवार आणि त्यांच्या गुंडाना लोकशाहीचे धिंडवडे काढण्याकरिता प्रशासनाकडून मोकळे रान दिले गेले आहे. सरकारच्या पाठिंब्यामुळे आणि मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादामुळे हे सर्व घडत आहे’, असा आरोप करून निवडणूक आयोगाने या प्रकरणात तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी खर्गे यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पंकजा मुंडेंना स्टेजवर आली चक्कर; खासगी रुग्णालयात केले दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -