घरदेश-विदेशकाँग्रेस देशभर बेरोजगारांची करणार नोंदणी

काँग्रेस देशभर बेरोजगारांची करणार नोंदणी

Subscribe

मोदी सरकारला घेरण्यासाठी नवी रणनीती, टोल क्रमांक जारी

मोदी सरकारला अडचणीत आणण्यासाठी काँग्रेसने आता नवी रणनीती आखली आहे. रोजगार कुठे आहे? असा सवाल करत युवक काँग्रेसने गुरुवारी देशव्यापी मोहीम सुरू केली. राष्ट्रीय बेरोजगारी रजिस्टर (एनआरयू) असे या मोहिमचे नाव आहे. राष्ट्रीय स्तरावर बेरोजगारांनी त्यांच्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक प्रसिद्ध केला आहे. त्यावर मिस्ड कॉल देऊन बेरोजगारांनी समर्थन द्यावे, असे म्हटले आहे.

मोदी सरकारच्या विरोधात सध्या काँग्रेस विविध मुद्यांच्या आधारे जनमानसांत नाराजी पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी मागील दोन महिन्यांपासून काँग्रेसने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनपीआर या दोन कायद्याच्या आधारे देशभरात आंदोलन सुरू केल्यानंतर आता काँग्रेसच्या अजेंड्यावर बेरोजगारी हा मुद्दा आला आहे. देशात बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक आहे. सरकार सीएए, एनआरसी आणि एनपीआर आदी आणून युवकांची दिशाभूल करत आहे.

- Advertisement -

त्यामळे आम्ही राष्ट्रीय पातळीवर नॅशनल रजिस्टर ऑफ अनएम्पॉइड म्हणजेच एनआरयू मोहीम सुरू केली आहे, असे युवक काँग्रेसने म्हटले आहे. या अंतर्गत युवक काँग्रेसने बेरोजगारांच्या नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. त्यावर मिस्ड कॉल देऊन बेरोजगार युवक आपलं समर्थन नोंदवू शकतात. बेरोजगारीविरोधात ही मोहीम सुरू केली आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

या मुद्द्यावर व्हिडिओ, पोस्टर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या माध्यमातून बेरोजगारीच्या मुद्द्यावर सोशल मीडियाद्वारे सरकारला थेट जाब विचारला जाणार आहे. याआधीही आर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजप सरकारवर वारंवार तोफ डागली आहे. भाजप सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळात पहिल्यांदाच काँग्रेसने देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. युवक काँग्रेसची ही मोहीम मोदी सरकारला घेरण्यात कितपत यशस्वी ठरेल, हे पाहणे आत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -