घरदेश-विदेशसप्टेंबर महिन्यापासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार

सप्टेंबर महिन्यापासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार

Subscribe

देशातील शाळा सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या योजनेवर चर्चा झाली. मात्र असे जरी असले तरी शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोपवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत कसे आणि कधी आणायचे हा निर्णय राज्य सरकारांनीच घ्यायचा, असेही बैठकीत ठरल्याचे समजते.

शाळा सुरू करताना विविध वर्गांसह संपूर्ण शाळा सॅनिटाइज करणे अनिवार्य असणार आहे. पहिल्या १५ दिवसांमध्ये १० ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले जाऊ शकते. त्यानंतर सहावी ते नववीचे वर्ग सुरु केले जाऊ शकतात. एका इयत्तेतील सर्व तुकड्यांना एकाच दिवशी शाळेत बोलावले जाणार नाही. प्रत्येक तुकडीला दिवस ठरवून दिला जाईल. शाळांना दोन शिफ्टमध्ये काम करण्यास सांगितले जाऊ शकते. ही वेळा सकाळी ८ ते ११ आणि १२ ते ३ अशी असू शकते. प्राथमिक आणि पूर्व-प्राथमिक विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्याबद्दल कोणतीही योजना नाही.

- Advertisement -

शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत शाळा पुन्हा सुरू करणे हे एक आव्हान असल्याचे मान्य करण्यात आले. तसेच शाळा सुरू करण्याबाबत आवश्यक ती काळजी राज्य सरकारांना घ्यायची असल्यामुळे याबाबत अंतिम निर्णय राज्य सरकारांचाच असल्याचेही ठरवण्यात आले. शाळा सुरू करताना कोरोनाला प्रतिबंध होईल, अशा सर्व उपाययोजना करणे आणि त्याचे निरीक्षण केल्यानंतरच शाळा सुरू करण्यास परवानगी देणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -