घरमहाराष्ट्रबुलडाण्यात कंटेनर आणि कारमध्ये भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू

बुलडाण्यात कंटेनर आणि कारमध्ये भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू

Subscribe

सिमेंट घेऊन जाणाऱ्या कंटेनरने कारला धडक देऊन ५० फूटावर ढकलत नेले. हा अपघात ऐवढा भीषण होता की अपघातामध्ये कार चा चक्काचूरा झाला.

बुलडाण्यामध्ये भीषण अपघातामध्ये ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी मध्यरात्री नागपूर – औरंगाबाद महामार्गावर सिमेंट कंटेनर आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक फाट्याजवळ ही घटना घडली आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

अशी घडली घटना

सिमेंट घेऊन जाणाऱ्या कंटेनरने कारला धडक देऊन ५० फूटावर ढकलत नेले. हा अपघात ऐवढा भीषण होता की अपघातामध्ये कार चा चक्काचूरा झाला. त्यामुळे मृतांना कारमधून बाहेर काढणे कठिण होते. जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातातील मृतांमध्ये औरंगाबादच्या क्षीरसागर कुटुंबातील ३ जणांचा समावेश आहे तर कारचालकाचा देखील मृत्यू झाला आहे. मनोहर क्षीरसागर (७० वर्ष), त्यांची पत्नी नलीनी क्षीरसागर (६६ वर्ष), मुलगी मेघा क्षीरसागर (३५ वर्ष), आणि कार चालक सुगदेव नागरे (२५ वर्ष) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

- Advertisement -

कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल

अपघातातील मृत्यू झालेले क्षीरसागर कुटुंबिय हे वाशीमला त्यांच्या मुलासाठी मुलगी पहायला गेल्याची माहिती मिळत असून परत येताना हा अपघात झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करुन कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, महिनाभरापूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन ५ जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा – 

- Advertisement -

हिमाचल प्रदेशातील बस अपघातामध्ये आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -