घरमहाराष्ट्रकशेडी घाटात एसटी बसला कंटेनरची धडक

कशेडी घाटात एसटी बसला कंटेनरची धडक

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात धामणदेवी गावाच्या हद्दीत एसटी बसवर कंटेनरची मागील बाजू आदळून अपघात झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३.४५ वाजता घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. चालक दिनकर सागर घोळवे (३१, रा.खेड) बस (एमएच १४ बीटी २७५४) घेऊन बोरिवलीहून खेडकडे निघाला होता, तर मयप्पा तुकाराम गरंडे (24, रा. नंदेशोर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) कंटेनर (एमएच ४६ एएफ ५६०९) घेऊन मुंबईच्या दिशेने घाट उतरत होता. त्यावेळी समोरून येणार्‍या बसच्या चालकाच्या उजव्या बाजूकडील भागावर या कंटेनरची मागील बाजू वेगात आदळली. बसमध्ये 22 प्रवासी होते. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. बसचे यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजताच कशेडी टॅपचे पोलीस उपनिरीक्षक राजेश उसगावकर, सहाय्यक फौजदार मधुकर गमरे, हवालदार समीर मोरे, हरीचंद्र पवार, संभाजी दुर्गावले, शैलेश कुर्डुनकर यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करून सर्व प्रवाशांना पुढील प्रवासासाठी अन्य बसमधून रवाना केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -