घरमहाराष्ट्रशेतकऱ्यांनंतर आता कंत्राटी कर्मचाऱ्यांचा लाँग मार्च विधानभवनवर धडकणार

शेतकऱ्यांनंतर आता कंत्राटी कर्मचाऱ्यांचा लाँग मार्च विधानभवनवर धडकणार

Subscribe

शेतकऱ्यांनंतर आता कंत्राटी कर्मचाऱ्यांचा लाँग मार्च विधानभवनावर धडकणार आहे.

शेतकरी लॉंग मार्चनंतर आता कंत्राटी कर्मचारी विधानभवनवर मोर्चा धडकणार आहे. नाशिक येथून या लाँग मार्चला सुरुवात होणार आहे. हजारो महिला आणि पुरुष या मोर्चात सहभागी झाली आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या तब्बल ५२ संघटना एकत्र येऊन सरकारला जाब विचारणार आहेत. राज्यातील सर्व आस्थापनेवरील आणि बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कायम समायोजन करण्यात यावे म्हणून ५२ संघटना एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या नाशिक ते मुंबई विधानभवन लाँग मार्च होणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष मुकूंद जाधवर यांनी नाशिक येथील श्री चिंतामणी मंगल कार्यालय येथे घोषित केले आहे.

कंत्राटी कामगारांचा आक्रोश

महासंघाचे अध्यक्ष जाधवर म्हणाले की, गेली अनेक वर्षे कंत्राटी कर्मचारी शासनाला सेवा देत आहेत. शासन आम्हाला फक्त वापरून सोडून देत आहे. केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या विविध योजनांवर कंत्राटी कर्मचारीच राबवत आहे. प्रशासन जाणूनबुजून काना डोळा करत आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, कामगार मंत्री, रोजगार मंत्री, कामगार विभागाचे प्रधान सचिव यांना कंत्राटी कर्मचारी यांच्या अनेक वेळा निवेदन देऊनसुद्धा आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. शासकीय कंत्राटी कर्मचारी अत्यंत अत्यल्प मानधनावर तसेच कुठलीही सामाजिक सुरक्षितता राज्य शासनाने दिलेली नसताना कार्यरत आहेत. राज्य शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याबाबत अद्याप कुठलीही भूमिका घेतलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने समान कामासाठी समान वेतन तसेच रोजंदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा कायम करणेबाबत निकाल दिलेले असताना कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागण्याचा शासन विचार करत नसल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांची वारी न्यायहक्कांसाठी विधानसभेच्या दारी यानुसार आपला प्रश्न राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी सोडवावेत. यासाठी नाशिक ते मुंबई विधानभवन लाँग मार्च २३ फेब्रुवारीला नाशिक येथून सुरु होऊन २६ फेब्रुवारी रोजी मुंबई विधानभवन येथे धडकणार आहे. असे म.रा. कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकूंद जाधवर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -