घरताज्या घडामोडीजीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत होण्यासाठी उभारले नियंत्रण कक्ष

जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत होण्यासाठी उभारले नियंत्रण कक्ष

Subscribe

भाजीपाला, दूध आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात अडचणी येत असल्याने वाहनांना सुरक्षित जाता यावे, यासाठी नगर आणि श्रीरामपूर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून शहरी भागात भाजीपाला, दूध आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात अडचणी येत असल्याने वाहनांना सुरक्षित जाता यावे, यासाठी नगर आणि श्रीरामपूर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. वाहतूक करणाऱ्या वाहनांना तेथून परवाने दिले जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशपाक खान यांनी दिली.

यासाठी उभारण्यात आले नियंत्रण कक्ष

पोलीस आणि परिवहन विभागाकडून अत्यावश्यक सेवा आणि वस्तू यांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांना प्रमाणपत्र जारी करण्याबाबत निर्देश दिले आहेत. पोलीस प्रशासनाने त्यासाठी सहकार्य करायाचे आहे. प्रमाणपत्र केवळ संचारबंदीच्या कालावधीसाठीच वैध राहणार आहे. संचारबंदीमुळे अत्यावश्यक मालांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना कार्यालयात येणे अडचणीचे होत आहे. परिवहन कार्यालयातील गर्दी टाळणे हेदेखील महत्वाचे आहे. त्यामुळे स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याचे खान यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील अनेक गावांत दूध, भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. राज्यभरात बाजार समित्या सुरू असताना नगर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हाभरातील बाजार समित्या बंद आहेत. त्याचे गंभीर परिणाम भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर होत आहेत. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाउन’ असल्याने पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी केलेली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्याला परवानगी असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले, तरी ग्रामीण भागातील वाहने शहरात येत नसल्याने भाजीपाला, दुधाची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि वाहने अडवली जाऊ नयेत, यासाठी नगर, श्रीरामपूर येथे परिवहन विभागाने नियंत्रण कक्ष केले आहेत.

विशेष म्हणजे परवान्यासाठी कार्यालयात न जाता व्हॉट्सआपचा वापर केला जाईल. व्हॉट्सअप क्रमांकवरच परवानगीचे प्रमाणपत्र पाठविले जाणार आहे. प्रमाणपत्रासाठी ई-मेल आणि ‘व्हॉट्सअप’वर अर्ज पाठविताना त्यासोबत वाहनांची आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून पाठवावी लागतील. तसेच अर्जामध्ये अर्जदाराचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, वाहन क्रमांक, वाहनाचा प्रकार आदी माहिती नमूद करावी लागेल.

- Advertisement -

नियंत्रण कक्षाचा व्हॉट्सआप क्रमांक

८१७७८२४८४० या क्रमांकावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. वाहतुकीचा परवाना घेण्यासाठी कार्यालयात यावे लागणार नाही. त्यामुळे या पद्धतीनेच परवाने मिळवावेत, असे आवाहन माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशपाक खान यांनी केले आहे.


हेही वाचा – आदेशानंतरही खाजगी दवाखाने, रूग्णालये बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांचे परवाने तात्काळ रद्द


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -