पुणेरी पगडीवरून पुणे विद्यापीठात वाद

पुणेरी पगडीवरून पुणे विद्यापीठामध्ये पदवीदान समारंभादरम्यान वाद उफाळून आला. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, पोलिसांनी ४ विद्यार्थ्यांना देखील ताब्यात घेतलं.

Pune
Puneri Pagdi

पुणेरी पगडीवरून पुणे विद्यापीठामध्ये पदवीदान समारंभादरम्यान वाद उफाळून आला. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, पोलिसांनी ४ विद्यार्थ्यांना देखील ताब्यात घेतलं. पदवीदान समारंभामध्ये ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’ घालून पदवीदान सोहळा पार पडणे हा आजवरचा शिरस्ता. पण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान सोहळ्यामध्ये कॉन्व्होकेशन ड्रेस ऐवजी कुडता, पायजमा, उपरणे आणि पुणेरी पगडी घालण्याचा निर्णय झाला. त्यानंतर वादाला सुरूवात झाली. काही विद्यार्थ्यांनी आणि संघटनांनी त्याला जोरदार देखील विरोध केला. पण, विद्यापीठानं मात्र आपला निर्णय कायम ठेवला. अखेर गणवेशात पुणेरी पगडीचा समावेश करावा की फुले पगडीचा यावरुन वाद निर्माण झाला होता. दरम्यान, शुक्रवारी पदवीदान समारंभ सुरू असताना काही विद्यार्थ्यांनी त्याला आक्षेप घेत पुणेरी पगडी नको, फुले पगडी द्या अशी मागणी केली. शिवाय, जोरदार घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

वाचा – पुणे विद्यापीठाची ‘ही’ ऐतिहासिक परंपरा मोडणार

का घेतला निर्णय?

पदवीदान सोहळ्याला घोळदार गाऊन आणि टोपी घालण्याची परंपरा ब्रिटीशकाळापासून सुरू होती. आजही जवळपास सर्रास विद्यापीठांमध्ये ही परंपरा कायम आहे. काही महिन्यांपूर्वी भारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान कार्यक्रमासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह अले होते. यावेळी त्यांनी ब्रिटिशकालीन पद्धत बंद करण्याची गरज व्यक्त केली. त्यानंतर पुणे विद्यापीठानं देखील यामध्ये पुढाकार घेत ‘कॉन्व्होकेशन ड्रेस’ ऐवजी कुडता, पायजमा, उपरणे आणि पुणेरी पगडी असा पोशाख असेल असे ठरवण्यात आले. पण, त्यावरून विद्यार्थ्यांनी आता आक्षेप देखील घेतला आहे.

विद्यार्थ्यांचं म्हणणं काय?

काही विद्यार्थ्यांनी याला विरोध देखील केला आहे. पुणेरी पगडी हे पेशवाईचे लक्षण आहे. तर,  फुले पगडी हे शिक्षणाचं प्रतिक असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे.

वाचा – पडद्याआडचे पगडीआख्यान

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here