घरताज्या घडामोडीअर्ध जग झाल करोनाग्रस्त

अर्ध जग झाल करोनाग्रस्त

Subscribe

जगभरात सध्या अमेरिकेतच चर्चेत आहे, त्याच कारण आहे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात करोनाची झालेली लागण. अमेरिकेत जवळपास ८५ हजार ५०० जणांना करोनाची लागण झाली आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनुसार आता संपुर्ण जगभरात करोनाची लागण झालेल्यांची आकडेवारी आता ५ लाख ३१ हजार इतकी झाली आहे. तर करोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा आता २४ हजार झालेला आहे. जगभरातील एकुण १७० देशांमध्ये करोनाची लागण झालेली आहे.

 

- Advertisement -

corona world

चीनमध्ये करोनाची लागण झालेल्यांचा आकडा ८० हजार ५०० आहे. तर जगभरात आता करोनावर उपचार घेऊन करोना निगेटीव्ह झालेल्यांची आकडेवारी ही १ लाख २२ हजार इतकी आहे. जगभरात मृत्यू झालेल्या २४ हजार ५४ लोकांपैकी अमेरिकेतला आकडा हा १२८८ इतका आहे. तर इटलीत जगभरातल्या देशांमध्ये सर्वाधिक असे मृत्यू म्हणजे ८२०० लोक मृत्यूमुखी पडले आहेत. भारतातही आता १.३ अब्ज लोकांना लॉ़कडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. भारतात आतापर्यंत करोनामुळे १७ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर करोनाची लागण झालेल्यांचा आकडा आता ७०० झालेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -