घरCORONA UPDATECoronavirus : कोरोनाचा फटका अब्जावधींवर, १२ दिवसांमध्ये २२६ अब्जावधीशांची संपत्ती घटली!

Coronavirus : कोरोनाचा फटका अब्जावधींवर, १२ दिवसांमध्ये २२६ अब्जावधीशांची संपत्ती घटली!

Subscribe

१२ दिवस अगोदर यादीच्या तुलनेत २२६ अब्जावधी कमी झाले आहेत. म्हणजेच १२ दिवसांमध्ये २२६ अब्जावधीशांची संपत्ती इतकी घटली की त्यांना यादीतून काढता पाय घ्यावा लागला आहे.

आता कोरोनाचा फटका अब्जावधी लोकांनाही बसू लागला आहे. गुरुवारी फॉर्ब्सने २०२० च्या जाहीर केलेल्या यादीनुसार, १८ मार्चला या यादीला अंतिम स्वरूप देतेवेळी जगात २,०९५ अब्जाधीश होते. हे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत ५८ ने कमी आहे. १२ दिवस अगोदर यादीच्या तुलनेत २२६ अब्जावधी कमी झाले आहेत. म्हणजेच १२ दिवसांमध्ये २२६ अब्जावधीशांची संपत्ती इतकी घटली की त्यांना यादीतून काढता पाय घ्यावा लागला आहे. यावेळी २०९५ अब्जावधीशांपैकी ५१ टक्के जणांची संपत्ती घटली आहे. विद्यमान अब्जावधींची एकूण संपत्ती ८ ट्रिलियन डॉलर आहे. २०१९ च्या तुलनेत ती ७०० अब्ज डॉलरने कमी झाली.

जेफ बेजोस : संपत्तीत घट – ११३ अब्ज डॉलर

तिसऱ्या वर्षी अग्रस्थानी पण संपत्तीमध्ये १८ अब्ज डॉलरने घट झाली आहे. यावर्षी पत्नी मॅकन्झीला घटस्फोट देण्यासाठी ३६ अब्ज डॉलर्स दिले. त्यामुळे ते यादीत २२ व्या स्थानावर आहेत.

- Advertisement -

बिल गेट्स : श्रेणी वाचली – ९८ अब्ज डॉलर

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स दुसऱ्या स्थानी कायम आहेत. परंतु त्यांची संपत्ती ९६.५ अब्ज डॉलरने वाढून ९८ अब्ज डॉलर झाली आहे.

बर्नार्ड बफेट : ७६ अब्ज डॉलर

गतवर्षी चौथ्या स्थानावरचे बर्नार्ड वॉरेन बफेट एक पायरीवर सरकले आहे. यांची संपत्ती ना वाढली ना घातली. ते पहिल्यांदाच एक पायरी वर चढले.

- Advertisement -

मुकेश अंबानी : संपत्तीमध्ये घट – ४४.३ अब्ज डॉलर

रिलायन्स इंडस्ट्रीजचे एमडी गतवर्षी ५० अब्ज डॉलरसह १३ स्थानावर होते. जिओमुळे यश मिळाले असूनही कोरोनामुळे संपत्तीत ५.७ अब्ज डॉलरची घट झाली आहे.

दमानी : श्रेणी व संपत्ती वाढ – १६.४ अब्ज डॉलर

गेल्यावर्षी ११.१ अब्ज डॉलरसह १२२ व्या स्थानी होते. श्रेणी व संपत्ती वाढ झाली आहे.

शिव नाडर : श्रेणी संपत्ती घट – १२. ३ अब्ज डॉलर

यादीत तिसऱ्या क्रमांकाचे भारतीय शिव नाडर गतवर्षी १४.६ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ८२ व्या स्थानावर होते. यावेळी संपत्ती घटली, श्रेणीही घसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -