घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईमध्ये कोरोनाचे १२७४ नवे रुग्ण

Corona Live Update: मुंबईमध्ये कोरोनाचे १२७४ नवे रुग्ण

Subscribe

एकीकडे राज्यात आज दिवसभरात २७३९ नवे कोरोना रुग्ण सापडले असताना त्यातले १२७४ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाबाधितांचा आकडा आता ४७ हजार १२८ इतका झाला आहे. याशिवाय आज दिवसभरात राज्यात १२० रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी त्यातले ५७ मृत्यू एकट्या मुंबईत झाले आहेत. त्यामुळे मुंबई अजूनही कोरोनाबाबत हॉटस्पॉटच असून मुंबईतली परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली आहे. आज मुंबईतल्या विविध रुग्णालयांमधून १२७४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतल्यामुळे ही मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बाब म्हणता येईल. मात्र, एकूण मृतांचा आकडा १५७५ पार गेलेला असताना काळजी देखील कमी होण्याचं नाव घेत नाहीये. (सविस्तर वाचा)


डोंबिवलीत तिघांचा मृत्यू!

ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवारी दिवसभरात १२४ रूग्णांची नोंद झाली तर ८० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय कल्याण-डोबिवली महापालिका क्षेत्रात आज दिवसभरात सर्वाधिक ७१ नवीन रूग्णांची नोंद झाली असून डोंबिवलीतील तीन करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाण्यात करोनाबाधितांचा आकडा चार हजाराच्या उंबरठयावर येऊन ठेपला आहे तर केडीएमसीत रूग्णांची संख्या १३९९ वर पोहोचली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

बेस्ट बसेस सोमवारपासून होणार सुरु

गेल्या दोन महिन्यापासून सर्व सामान्य प्रवाशांसाठी बंद असलेली बेस्ट सेवा सोमवारपासून पुन्हा सुरु होत आहे. अनलॉक-२च्या दुसर्‍या टप्प्यात ज्यात १० जूनपासून खासगी कार्यालये कामगारांच्या १० टक्के उपस्थितीत सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवाशांना सेवा पुरविणाची परवानगी बेस्ट उपक्रमाला देण्यात आली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने ८ जूनपासून बेस्टच्या फेर्‍या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. (सविस्तर वाचा)


राज्यावरचं कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. एकीकडे राज्य सरकारनं मिशन बिगीन अगेन सुरू केलेलं असतानाच दुसरीकडे रुग्णसंख्या मात्र वाढतच असून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होत आहे. आज दिवसभरात राज्यात १२० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा २९६९ झाला आहे. याशिवाय राज्यात आज २७३९ नव्या रुग्णांचं निदान झालं असून एकूण रुग्णांचा आकडा ८२ हजार ९५८ इतका झाला आहे. यातले ३७ हजार ३९० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आज घडीला ४२ हजार ६०० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

अहमदनगर जिल्ह्यात आज ९ कोरोना रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात आज ९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ६१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांचा आकडा २०४ वर गेला आहे तर १० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच १०४ कोरोनाबाधित व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहेत.


नाशिक मालेगावमध्ये आणखी  १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

मालेगावमध्ये आणखी १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये एका ८ वर्षीय मुलाचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून नाशिक शहरातील अनेक विभाग सील करण्यात आले आहेत.


जालन्यात कोरोनाचा चौथा बळी

जालना येथील घनसावंगी तालुक्यातील पांगरा येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत झालेली महिला काहीदिवसांपूर्वीच मुंबईतून जालन्यात परतली होती.


धुळे जिल्ह्यात ११ कोरोना पॉझिटिव्ह

धुळे जिल्ह्यात आणखीम११ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर गेल्या २ दिवसांत कोरोनाचा आलेख वाढता दिसून येत आहे. तर धुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या २१५ वर गेली असून आतापर्यंत ९७ रुग्णांना डिस्चार्ज देणायात आला आहे. तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत एकूण ३३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात एकूण १ हजार ४९८ पोलिसांमध्ये कोरोनाची तीव्र लक्षणे आढळून आली आहेत. यामध्ये १९५ अधिकारी आहेत.


पुणे : कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुबंई शहरातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारी बरोबरच पुण्यात देखील कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ हजार ४३८ झाली आहे. तर पुणे विभागातील ६ हजार ४८६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ४ हजार ४२८ अॅक्टिव्ह रुग्ण असून आतापर्यंत ५२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच, २५८ रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. (सविस्तर वाचा)


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनाने मृत्यू?

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण झाल्याचे सीएनएनच्या न्यूज १८च्या वृत्तानुसार समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच आता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. (सविस्तर वाचा)


दिलासादायक बाब म्हणजे काल महाराष्ट्रात एकही पोलिसांच्या कोरोनाबाधित होण्याची नोंद झालेली नाही. मात्र दोन पोलिसांचा गेल्या २४ तासांत कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात २ हजार ५६१ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी ३३ जणांचा त्यामुळे झाल्याची नोंद आहे.


कर्नाटकात बसमध्ये वाहकाने स्वतःच पीपीई किट आणि मास्क घालून प्रवाशांचे तिकीट कापले.


देशात काल ९ हजार ८८७ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून काल दिवसभरात २९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता देशात कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ३६ हजार ६५७ इतका झाला आहे. यात १ लाख १५ हजार ९४२ इतके अॅक्टीव्ह केसेस असून आतापर्यंत १ लाख १४ हजार ०७३ लोकांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. तर एकूण मृतांची संख्य ६ हजार ६४२ इतकी झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.


देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख २६ हजार ७७० झाली आहे. त्यापैकी ६ हजार ३४८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ०९ हजार ४६२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण १ लाख १० हजार ९६० आहेत. तर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८० हजार २२९ झाली आहे. राज्यात आज एकूण ४२ हजार २१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर काल राज्यात १३९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत एका दिवसातील ही सर्वाधिक मृत्यू झालेली संख्या आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -