घरमहाराष्ट्रLockDown: संचारबंदीचे उल्लंघन; बारामतीत न्यायालयाकडून तिघांना शिक्षा

LockDown: संचारबंदीचे उल्लंघन; बारामतीत न्यायालयाकडून तिघांना शिक्षा

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवक संचारबंदीचे नियम मोडल्याने बारामतीत न्यायालयाकडून तिघांना शिक्षा करण्यात आली आहे. ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. मात्र या लॉकडाऊनचे पालन न केल्याने बारामती तालुक्यात काही ठिकाणी चांगलेच महागात पडले. संचारबंदी असताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना आपण फक्त पोलिसांच्या दांडक्याने नियम मोडणाऱ्याला फटकवताना बघितले आहे. परंतू आता लॉकडाऊनचे नियम न पाळल्यास तुम्हाला सरळ तुरुंगात जावे लागणार आहे. संचारबंदीच्या नियमांचे पालन न केल्याने बारामतीमध्ये न्यायालयाने तिघांना शिक्षा सुनावली आहे.

लॉकडाऊनचे पालन न केल्याने बऱ्याच जणांवर गुन्हे दाखल

लॉकडाऊन असतानाही नियम तोडल्याने बारामतीत बऱ्याच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला असून न्यायालयाने तिघांना शिक्षा दिली आहे. यामध्ये बारामती तालुका पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, श्रीरामनगर येथील अफजल बनीमिया, सुर्यनगरी येथील चंद्रकुमार जयमंगल शहा आणि वडगाव येथे राहणारा अक्षय चंद्रकांत शहा निंबाळकर या सर्व आरोपींना प्रत्येकी तीन दिवस कैद किंवा ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

- Advertisement -

‘रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्यांची खैर नाही’

कोरोनाविरुद्ध राज्य सरकारने कंबर कसली असून त्यासाठी अनेक पातळ्यांवर निर्णय घेतले जात आहेत. राज्यात गेल्या ८ दिवसांपासून लॉकडाऊन सुरू असून तरी देखील भाजीपाला खरेदी करण्यासाठी किंवा किराणा खरेदी करण्यासाठी अनेकदा सांगून देखील मोठ्या संख्येने नागरिक बाहेर फिरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी भाजीपाला मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून कठोर पावलं उचलली जातील असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ‘बेजबाबदारपणानं वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकायचा असेल तर बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही’, असा स्पष्ट इशाराच उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -