Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत झाली वाढ!

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत झाली वाढ!

शुक्रवारी ७३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर गुरुवारी ७२, बुधवारी ६६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५ टक्के आहे

Related Story

- Advertisement -

चार दिवसांपासून राज्यात कोरोना बाधित मृत्यूच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी ७३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर गुरुवारी ७२, बुधवारी ६६ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५ टक्के आहे.

राज्यात ७३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबई ११, पनवेल ३, नाशिक ६, अहमदनगर ४, पुणे १२, सोलापूर ५, नागपूर ११ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या मृत्यूपैकी ३७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२ मृत्यू पुणे ६, वर्धा ४, नागपूर ३, नाशिक २, सोलापूर २, ठाणे २, औरंगाबाद १, जालना १ व लातूर १ असे आहेत. राज्यात ३,६९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,६१,९७५ झाली आहे. राज्यात एकूण ५१,८३८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisement -

शुक्रवारी २८९० रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,५८८,९९९ करोना बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के एवढे झाले आहे. दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३२, ६७,९१७ प्रयोगशाळा नुमन्यांपैकी १९,६१,९७५ (१४.७९ टक्के)नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४२,५८५ व्यक्ती होमक्वारंटाईन असून ३,०१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -