घरताज्या घडामोडीधक्कादायक! धुळ्यातील कोविड क्वारंटाईन सेंटरमधून १५ रुग्णांनी केले पलायन!

धक्कादायक! धुळ्यातील कोविड क्वारंटाईन सेंटरमधून १५ रुग्णांनी केले पलायन!

Subscribe

पलायन केलेल्या रुग्णांच्या शोधासाठी वैद्यकीय पथक रवाना झाले आहे.

धुळ्यातील कोविड क्वारंटाईन सेंटरमधून पॉझिटिव्ह रुग्णांनी पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. एकूण १५ रुग्णांनी पलायन केले असून यामध्ये ९ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आहे. त्यामुळे पलायन केलेल्या रुग्णांविरोधात देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्याची तपासणी आणि चौकशी प्रशासनाकडून सुरू असतानाच या १५ रुग्णांनी पलायन केले आहे. व्यवस्थित सुविधा मिळत नसल्याचे कारण या सर्वांनी सांगितले आहे. मात्र दुसरीकडे वैद्यकीय विभागाकडून कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नाही अशा स्वरुपाचा प्रतिदावा केला जात आहे. त्यामुळे आता पलायन केलेल्या रुग्णांमुळे अनेकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. म्हणून या रुग्णांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते जिथे राहत होते तिथे वैद्यकीय पथक त्याच्या शोधा रवाना झाले आहे. त्यामुळे काही वेळांनी या रुग्णांना पुन्हा क्वारंटाईन केले जाईल अशी माहिती मराठी वृत्तवाहिनीला देण्यात आली आहे.

- Advertisement -

शनिवारी धुळे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे २४ नवे रुग्ण आढळले असून ३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे धुळ्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार २४८वर पोहोचला आहे. शनिवारी आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहरातील २०, ग्रामीण भागातील १ तर शिरपूरमधील १, शिंदखेड्यातील २ रुग्णांचा समावेश आहे.


हेही वाचा – Corona: औरंगाबादमध्ये १२८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, एकूण आकडा ६६४४वर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -