घरमहाराष्ट्रनाशिकसाराच गोंधळ : चुकीची माहिती टाकल्याने मोबाईल ॲपमध्ये दाखवले कोरोना पॉझिटिव्ह

साराच गोंधळ : चुकीची माहिती टाकल्याने मोबाईल ॲपमध्ये दाखवले कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

घदिवसभर प्रशासकीय यंत्रणा धरली वेठीस

मोबाईल ॲपमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून त्यातील प्रश्नांची उत्तरे चुकीची दिल्याने ‘कोविड १९ की टेस्ट पोझीटिव्ह है’ असा संदेश आला आणि मोबाईलधारकाने मला कोरोनाच झाला आहे, असा धोशा लावून मंगळवारी दिवसभर प्रशासकीय यंत्रणा वेठीस धरल्याने तालुक्यात एकच गोंधळ उडाला.
“ॲपमध्ये बघा. मी  कोरोना पोझीटिव्ह आहे. मला इस्पितळात दाखल करा” असे सांगत सदर व्यक्तीने १०८ नंबर डायल करून रुग्णवाहिका बोलावली.  व्यक्ती उच्चशिक्षित सेवानिवृत्त असून ग्रामीण भागात राहत असते. वेहेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून  तातडीने रुग्णवाहिका पाठविण्यात आली. प्राथमिक तपासणी ठिकाणावर (गावी)  व नंतर वेहेळगाव येथे करण्यात आली. कोविड १९ चे कोणतीही लक्षण त्या व्यक्तीत दिसून आली नाही. असे असले तरी त्या व्यक्तीने पीपीई घालून तपासा, माझा स्वाब घ्या…. बघा…. ॲपमध्ये मी कोरोना पोझिटिव्ह असल्याचे दाखवत आहे.
व्यक्तीचा आरडा ओरडा सतत चालूच राहिल्याने त्याला नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणले गेले.  वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे यांनी तपासले असता त्याचे तपमान ३६ अंश सेल्सियस व ऑक्सिजन ९९ पातळीवर होता. इतर लक्षणे विचारण्यात आली. घसा खवखवतो का? खोकला आहे का. इत्यादी त्यातून डॉक्टरांनी कोरोनाची लक्षणे नाहीत असे सांगुन सुद्धा  व्यक्ती ऐकावयास तयार नव्हती. त्यानंतरतालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे आले, त्यांनी अनेक परीने समजावून सांगीतले. तालुक्यातले अहवाल दाखवले. तेव्हा कुठे त्याचे समाधान झाले. सकाळी ११ बाजेपासून सुरु झालेले नॉन कोरोना नाट्य अखेरीस ४.३० वा. संपले. आणि आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास सोडला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -