घरCORONA UPDATECoronaVirus: अहमदनगरमध्ये एकाच दिवशी नऊ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

CoronaVirus: अहमदनगरमध्ये एकाच दिवशी नऊ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

Subscribe

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत अहमदनगरमध्ये तब्बल नऊ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवसांत ही संख्या दुपटीपेक्षा अधिक झाल्याने जिल्हा हादरला आहे.

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत अहमदनगरमध्ये तब्बल नऊ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवसांत ही संख्या दुपटीपेक्षा अधिक झाल्याने जिल्हा हादरला आहे. दरम्यान नव्याने आलेल्या रिपोर्टमध्ये संगमनेरच्या ४ जणांचा, नगरच्या २ जणांचा, २ परदेशी नागरिकांचा आणि जामखेडच्या एकाचा यात समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १७ झाली आहे. जिल्ह्यातील आजच्या वाढलेल्या संख्येने थेट दिल्ली कनेक्शन समोर आले आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, नगरमध्ये बुधवारपर्यंत कोरोनाचे आठ रुग्ण होते. गुरुवारी यात अचानक मोठी वाढ बघायला मिळाली. गुरुवारी दुपारी प्रशासनाला ८१ पैकी ५१ अहवाल प्राप्त झाले होते. यामध्ये जिल्ह्यातील सहा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर रात्री उशिराने प्रशासनाला नव्याने पुन्हा ६० व्यक्तींचे चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे. यामध्ये संगमनेरमधील दोघांचा समावेश आहे. यापैकी एक जण दिल्लीतून आलेल्या परदेशी नागरिकाच्या संपर्कातील असून दुसऱ्याचे लासलगाव कनेक्शन समोर आले आहे. दुसरा रुग्ण तालुक्यातील आश्वी येथील असून तो लासलगावच्या रुग्णाच्या संपर्कात आला होता. तर संगमनेर मधील १५ संशयितांपैकी सकाळी २ पॉझिटिव सापडल्यानंतर रात्रीच्या रिपोर्टमध्ये आणखी यातील एकाचा सहभाग वाढला आहे. याशिवाय जामखेडमधील आणखी एक रुग्ण वाढल्याने तेथील एकूण रुग्णांची संख्या चारवर पोहोचली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, गुरुवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये आणखी तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे. एकेक करत तब्बल चार जण बाधित सापडल्याने प्रशासमोरच्या चिंता वाढल्या आहेत. तर संगमनेरकरात भिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अजूनही वेळ गेली नसल्याने प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करताना पुढचे काही दिवस घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम यांनी केले आहे.

हेही वाचा –

वसईत कोरोनाने घेतला पहिला बळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -