घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात करोना नियंत्रणात: भीती होती ५२३ पॉझिटिव्ह रुग्णांची; प्रत्यक्षात आढळले ४७

नाशकात करोना नियंत्रणात: भीती होती ५२३ पॉझिटिव्ह रुग्णांची; प्रत्यक्षात आढळले ४७

Subscribe

(३२ रुग्णांना आजवर डिस्चार्ज; पालिकेच्या वैद्यकीय विभागाची जोरदार कामगिरी)

करोनाच्या प्रादुर्भावाचा वेग बघता नाशिकमध्ये १५ मे पर्यंत साधारणत: ५२३ इतकी रुग्णसंख्या असेल असा अंदाज राज्य शासनाने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात आजवर शहरात केवळ ४७ रुग्णच आढळून आल्याने महापालिका, जिल्हाप्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. विशेषत: यामुळे सर्वसामान्य नाशिककर भीतीतून काही प्रमाणात बाहेर येण्यास मदत होणार आहे.
शहरात गोविंदनगर मध्ये ६ एप्रील रोजी पहिला रुग्ण आढळल्यानंतर १० एप्रील रोजी नवशा गणपती आणि नाशिकरोड परिसरात दोन रुग्ण आढळले होते. १५ मे पर्यंत हीच संख्या ४७ इतकी झाली. मार्च महिन्यात जेव्हा सुरूवातीला केरोना रूग्ण आढळले तेव्हापासून पालिकेचा वैद्कीय विभाग सतर्क झालेला होता. पालिकेची वैद्यकीय पथकेही सज्ज होती. रूग्ण आढळल्यानंतर तातडीने हाय रिस्क व लो ऱिस्क कॉन्टक्ट शोधणे, मोबाईल हिस्ट्रीवरून त्याचा वापर तपासणे तसेच निवासाशीसंबधित क्षेत्र प्रतिबंधीत केले जात होते. त्याचा परिणाम म्हणून ५० दिवसात केरोना जवळपास नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्यात काही तज्ञ संस्थांचा हवाला देत तसेच जागतिकपातळीवरील केरोना संसर्गाचा वेग याचा हिशोब करून १५ मे पर्यंत कोणत्या शहरात केरोनाचे किती रूग्ण असतील याचे अंदाज व्यक्त झाले. त्यात नाशिक शहरात ५२३ रूग्ण असतील असा अंदाज व्यक्त झाला. प्रत्यक्षात १५ पर्यंत ४७ रूग्णच सापडले असून केरोनाचा डबलींग रेटही कमी असून मृत्युदरही कमी असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेंद्र त्र्यंबके यांनी स्पष्ट केले.

११ प्रतिबंधित क्षेत्र झाले कमी :


गोविंदनगरपासून रविवारी रात्री नाशिकरोड येथील गायकवाड मळा येथील एक रेल्वे कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे संबधित निवास परिसर अर्थातच गायकवाड मळा हे प्रतिबंक्षित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ही ३४ वर पोहचली आहे. एखादे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्यानंतर तेथील नागरिकांवरर १४ दिवस बंधने टाकली जातात. ३४ पैकी ११ प्रतिबंधित क्षेत्र नवीन रूग्ण न आढळल्यामुळे रद्द केले आहेत.त्यामुळे शहरातील प्रतबंधित क्षेत्रांची सख्या आता २३ वर आली आहे.

- Advertisement -

रदद झालेले प्रतिंबधित क्षेत्र :

धोंगडे मळा,नवशा गणपती परिसर,म्हसरुळ,संजीव नगर,समाजकल्याण कार्यालय,सावता नगर,उत्तम नगर,पाथर्डी फाटा,सातपूर कॉलनी,वैद्य नगर.

या क्षेत्रात अद्यापही प्रतिबंध

बजरंगवाडी,शांतीनिकेतन चौक,माणेकशा नगर,समता नगर,पाटील नगर,हनुमान चौक,जाधव संकुल,हिरावाडी,श्रीकृष्ण नगर,इंदीरा नगर,तारवाला नगर,अयोध्या नगर,कोणार्क नगर २,धात्रक फाटा,धात्रक फाटा,सिन्नर फाटा,काठे गल्ली,आनंदवल्ली,पंडीत नगर,दसक,गोसावी वाडी,मोठा कुंभारवाडा,गायकवाडा मळा,

Dr. Rajendra Trambke

अंदाजानुसार १५ मे पर्यंत ५२३ केरोनाचे रूग्ण असतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात ४७ रूग्ण असून त्यातील दोन दगावले. तसेच ३२ घरी बरे होवून परतले आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असून रूग्ण दुप्पट होण्याचा वा मृत होण्याचा दर खुपच कमी असल्याची बाब नाशिककरांना दिलासा देणारी आहे.
डॉ राजेंद्र त्र्यंबके, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका

नाशकात करोना नियंत्रणात: भीती होती ५२३ पॉझिटिव्ह रुग्णांची; प्रत्यक्षात आढळले ४७
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -