Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईसह महाराष्ट्रातील लसीकरण कोविन Appमुळे २ दिवस स्थगित

मुंबईसह महाराष्ट्रातील लसीकरण कोविन Appमुळे २ दिवस स्थगित

पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार असल्याचा खुलासा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबई महापालिकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गाजावाजा करीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. मात्र लसीकरणात सर्वात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘कोविन ॲप’ मध्ये मोठी तांत्रिक समस्या उद्भवल्यामुळे आता कोरोना लसीकरण प्रक्रिया १७ व १८ जानेवारी असे दोन दिवस स्थगित करण्यात आली आहे. राज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये १८ जानेवारी पर्यंत लसीकरण सत्र रद्द केल्याच्या वृत्ता संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्रात आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कुठलेही कोरोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार असल्याचा खुलासा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.

कोविड १९ लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी करत असताना, या मोहिमेसाठी कार्यरत असलेल्या कोवीन ॲप मध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले. ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न केंद्र शासनाकडून सुरू आहेत. कोविड लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. तांत्रिक अडचण आल्याने ऑफलाईन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. तथापि यापुढील सर्व नोंदी ॲप द्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

- Advertisement -

ही बाब लक्षात घेता, मुंबईत १७ व १८ जानेवारी असे दोन दिवस कोविड १९ लसीकरण स्थगित ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने रात्री उशिराने घेतला आहे. मात्र कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.


हेही वाचा – ७४५ योद्ध्यांना कोरोना लस; ५५५ गैरहजर

- Advertisement -