घरदेश-विदेशकरोना विषाणू मुंबईत!

करोना विषाणू मुंबईत!

Subscribe

तीन संशयित रुग्ण आढळले

चीनमध्ये अल्पवधीतच २६ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला करोना विषाणू मुंबईत पोहचला आहे. करोना विषाणूचे तीन संशयित रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यांच्यावर सध्या मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये विशेष स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला असून तेथे कोणालाही जाण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.

३१ डिसेंबर या दिवशी चीनच्या वुहान शहरात करोना विषाणूने डोके वर काढले. त्याच्या प्रादुर्भावामुळे चीनमध्ये २६ जणांचा बळी गेला आहे. करोना विषाणू आजाराचा प्रादुर्भाव भारतात होऊ नये यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मुंबईत आढळलेले तीन रुग्ण हे चीनमधून आले आहेत. आतापर्यंत दोन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. पण, शुक्रवारी आणखी एक रुग्ण दाखल झाला आहे. या करोना विषाणूंची लक्षणे आढळणार्‍या रुग्णांना थेट विमानतळावरुन कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांसाठी त्यासाठी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -

करोना विषाणू कसा पसरतो?
करोना विषाणूहा हवेमार्फत पसरत असल्यामुळे तो अधिक धोकादायक आहे. ज्याच्या शरिरात हा विषाणू जातो ती व्यक्ती शिंकली, खोकली अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकली तर त्या व्यक्तीच्या शरीरातील विषाणू हवेतून पसरतो.

काय काळजी घ्याल?
ज्या व्यक्तीला श्वसन संस्थेचा आजार आहे, अशा सहवास टाळणे.
हात नियमित स्वच्छ धुणे.
न शिजवलेले अथवा अपुरे शिजवलेले मांस खाऊ नये.
फळे, भाज्या न धुता खाऊ नये.
काय आहे करोना विषाणू ?

- Advertisement -

करोना हे विषाणूच्या एका समुहाचं नाव आहे. साध्या सर्दी खोकल्यापासून ते सार्स किंवा मर्स यांसारख्या गंभीर आजारासाठी करोना विषाणू कारणीभूत असतात.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे स्क्रिनिंग – केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, करोना बाधित देशातून येणार्‍या प्रवाशांचे स्क्रिनिंग मुंबईसह देशातील सात विमानतळांवर सुरू करण्यात आले आहे. २३ जानेवारीपर्यंत मुंबई विमानतळावर १ हजार ७३९ प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. या मध्ये ६ प्रवासी हे मुंबई आणि पुण्यातील होते. यातील तिघांवर कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पुण्यातही आढळले दोन संशयित
करोना व्हायरसचे पुण्यात २ रुग्ण आढळले आहेत. पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये या रुग्णांची तपासणी आणि विमानतळावरुन येणार्‍या प्रवाशांच्या स्क्रिनिंगची सोय करण्यात आली आहे.

कोणाला खोकला असेल, ताप असेल तर त्या व्यक्तीने त्वरीत आपल्या रक्ताची तपासणी करावी. करोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. चीन, हाँगकाँगमध्ये गेलेल्या ३ जणांना करोनची लागण झाली आहे. त्यांना कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये वॉर्ड ४ मध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई पालिका, राज्यसरकार, केंद्र सरकार या विषाणूबद्दल सतर्क आहेत. कस्तुरबामध्ये विशेष कक्ष करोना व्हायरस विभाग आहेत. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
-सुरेश ककाणी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

विषाणूंची लक्षणे

सर्दी, खोकला.(कोल्ड)
तीव्र ताप.
श्वास घ्यायला त्रास होणे.
न्यूमोनिया, अतिसार.
मूत्रपिंड निकामी होणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -