घरमहाराष्ट्रकरोना निरीक्षणाखाली 'या' नऊ देशातील प्रवासीही; आणखी चार देशांची भर

करोना निरीक्षणाखाली ‘या’ नऊ देशातील प्रवासीही; आणखी चार देशांची भर

Subscribe

करोनाची तपासणी ४८ हजारांनी वाढली, आरोग्यमंत्र्यांची माहिती

करोनाने सध्या चीन या देशात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत चीनसह सहा देशांतील प्रवाशांची आरोग्य तपासणी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर केली जात होती. त्यानुसार, ज्या देशांमध्ये करोनाचे संशयित रुग्ण आढळत होते त्या सर्वांची थर्मल स्कॅनिंग तपासणी करण्याची नव्याने केंद्र सरकारकडून सूचना देण्यात आली आहे.

राज्य आरोग्य विभागाने करोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्याच्या उद्देशाने चीनसह अन्य नऊ देशांतील प्रवाशांचाही विचार केला आहे. हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द. कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनिशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या देशातील प्रवाशांचीही भर पडली असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आतापर्यंत चीनसह हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द. कोरिया, जपान या सहा देशांतील प्रवाशांची मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कनिंग होत होती. आता या सहा देशांमध्ये आणखी चार देशांची भर पडली आहे. नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या देशातून येणाऱ्या प्रवाशांचीही थर्मल स्कॅनिंग होईल. ज्या देशांमध्ये करोना व्हायरसचे संशयित असल्याचे समोर येईल त्या देशातील प्रवाशांची तपासणी आवश्यक असल्याने हे अधिकचे चार देश वाढवले असल्याचे राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबईत तिघांवर उपचार – 

दरम्यान, आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४८ हजार २९५ प्रवासी तपासण्यात आले आहेत. तर, राज्यात सध्या तीन जण मुंबई येथे भरती असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर, राज्यात बाधित भागातून २९१ प्रवासी आले आहेत. तसेच, राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ८३ जणांना भरती करण्यात आले होते. भरती करण्यात आलेल्यापैकी ८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. आजवर भरती झालेल्या ८३ प्रवाशांपैकी ८० जणांना हॉस्पिटलमध्ये घरी सोडण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -