घरमहाराष्ट्रराज्यात करोनाचे ७७ अहवाल निगेटीव्ह; चार जण निरीक्षणाखाली

राज्यात करोनाचे ७७ अहवाल निगेटीव्ह; चार जण निरीक्षणाखाली

Subscribe

आतापर्यंत निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या ७७ जणांपैकी ७३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबई आणि पुणे येथे प्रत्येकी दोन जण निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

करोना व्हायरसने चीनमध्ये धुमाकूळ घातला असून भारतात परतणाऱ्या प्रवाशांचीही वेगवेगळ्या विमानतळावर चौकशी केली जातेय. शिवाय, महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवर उपचार केले जात आहेत. आतापर्यंत राज्यात उपचार सुरू असलेल्या ७७ जणांचे प्रयोगशाळेतून मिळालेले नमुने निगेटीव्ह आले आहेत. तसंच, चार जण राज्यात निरीक्षणाखाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आतापर्यंत निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या ७७ जणांपैकी ७३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबई आणि पुणे येथे प्रत्येकी दोन जण निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisement -

२१ फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४४ हजार ५१७ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून २७९ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १७० प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

आजपर्यंत राज्यात ७७ जणांना भरती करण्यात आले होते. त्यांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी निगेटीव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला आहे. ७३ जणांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. सध्या प्रत्येकी २ जण मुंबई आणि पुणे येथे भरती आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध आणि नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात सध्या ३९ विलगीकरण कक्षांमध्ये ३६१ बेडस् उपलब्ध आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -