Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सावधान काळजी घ्या ! नवा कोरोना महाराष्ट्रात दाखल

सावधान काळजी घ्या ! नवा कोरोना महाराष्ट्रात दाखल

आठ प्रवाशांमध्ये आढळली लक्षणे

Related Story

- Advertisement -

कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनने अखेर महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील आठ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा वाढली आहे.

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकतंच ब्रिटनमधून परतलेल्या आठ प्रवाशांना नव्या कोरोनाची लक्षण आढळली होती. यातील पाच जण हे मुंबईतील आहेत. तर पुणे, ठाणे, मिरा-भाईंदर या ठिकाणाचे प्रत्येकी एक प्रवाशी आहेत. या सर्व प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे.

ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणुमुळे राज्यात अधिक दक्षता जात आहे. तरी परदेशातून अन्य राज्यात उतरून तेथून महाराष्ट्रामध्ये येणार्‍या प्रवाशांचा ओघ लक्षात घेता अशा प्रवाशांना ते उतरतील त्या विमानतळांवरच क्वारंटाईन करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येणार आहे. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी यासंदर्भात मुख्य सचिवांना निर्देश दिले.

- Advertisement -

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले. ब्रिटनमधून थेट मुंबईत उतरलेल्या प्रवाशांना नियमाप्रमाणे विमानतळावरून संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात येते मात्र. गेल्या काही दिवसांपासून असे निदर्शनास आले आहे की, इतर राज्यातील विमानतळांवर उतरून प्रवाशी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यांचा मागोवा काढणे शक्य होत नाही. केंद्र सरकारने अशा परदेश प्रवास करून आलेल्यांना त्या-त्या विमानतळांवरून क्वारंटाईन करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, लसीकरणानंतर त्याचे काही दुष्परिणाम झाल्यास त्यावरील उपचाराची पूर्वतयारी ठेवा. उपचार करणार्‍या डॉक्टरांना मार्गदर्शनासाठी टास्क फोर्ससारखी यंत्रणा तयार करावी. आरोग्य संस्थांमध्येच लसीकरण करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

- Advertisement -