Coronavirus – महाराष्ट्रात करोनाचा चौथा बळी, करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर!

Mumbai
corona patients

देशात करोनापासून मुक्तता मिळवण्यसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर दुसरीकडे करोग्रस्त रूग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. आज महाराष्ट्रात करोनाचा चौथा मृत्यू झाला आहे. वाशीयेथील एका करोनाग्रस्त महिलेचा मृत्यू उपचारादरम्यान झाला आहे. या महिलेवर वाशी येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.

राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात करोनाची लागण १२४ जणांना झाली आहे. या पाठोपाठ केरळमध्ये देखील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळमध्ये आतापर्यंत १०९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या देशातील करोना वाढता प्रसार पाहून संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसंच आतापर्यंत देशभरातील करोनाबाधितांचा आकडा ६०६वर पोहोचला आहे.

आतापर्यंत जगभरातील करोनाग्रस्तांचा आकडा ४ लाख ७४ हजार ५५३वर पोहोचला आहे. यापैकी २१ हजार २६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख १० हजार २९८ करोनाचे रुग्ण व्हायरस फ्री झाले आहेत. करोनामुळे मृत्यू झाल्याचा सर्वाधिका आकडा हा इटलीमध्ये आहे. इटलीमध्ये आतातर्यंत ७ हजारहून अधिक करोनाचे रुग्ण बळी पडले आहेत. तर चीनमध्ये ३ हजारहून अधिक करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here