घरCORONA UPDATECoronavirus Maharashtra: कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५ लाखांच्या वर पोहोचला

Coronavirus Maharashtra: कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५ लाखांच्या वर पोहोचला

Subscribe

राज्यात आज १२,८२२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५,०३,०८४ झाली आहे. तर १,४७,०४८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २७५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या १७ हजार ३६७ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे.

राज्यात २७५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ५८, ठाणे २१, वसई विरार मनपा ९, कल्याण डोंबिवली मनपा १२, मीरा भाईंदर ९, रायगड ९, नाशिक ८, पुणे ४७, पिंपरी चिंचवड २०, सोलापूर ७, कोल्हापूर ९ यांचा समावेश आहे. २७५ मृत्यूंपैकी २२२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर २८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २५ मृत्यू ठाणे ७, पुणे ६, पालघर ४, रायगड २, जालना २, नाशिक १, जळगाव १, सांगली १ आणि रत्नागिरी १ असे आहेत. आज ११,०८१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत ३,३८,३६२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६७.२६ टक्के एवढे झाले आहे.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २६,४७,०२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५,०३,०८४ (१९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,८९,६१२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,६२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -