घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात २५९८ कोरोना रुग्णांची नोंद; तर ८५ जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात २५९८ कोरोना रुग्णांची नोंद; तर ८५ जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज दिवसभरात राज्यात २५९८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ५९ हजार ५४६ झाली आहे. त्यापैकी १८ हजार ६१६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज दिवसभरात ६९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजघडीला राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३८ हजार ९३९ इतकी आहे. त्याशिवाय, आज दिवसभरात राज्यात ८५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची राज्यातली एकूण संख्या १९८२ इतकी झाली आहे.

कोरोना रुग्णांची सविस्तर आकडेवारी

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       ३५४८५ ११३५
ठाणे          ५३७
ठाणे मनपा ३२२६ ७१
नवी मुंबई मनपा २३९० ४१
कल्याण डोंबवली मनपा ११२९ १८
उल्हासनगर मनपा २४१
भिवंडी निजामपूर मनपा १०७
मीरा भाईंदर मनपा ५९० १०
पालघर १२९
१० वसई विरार मनपा ६९६ २०
११ रायगड ५२० १३
१२ पनवेल मनपा ४२४ १३
ठाणे मंडळ एकूण ४५४७४ १३३९
१३ नाशिक १४७
१४ नाशिक मनपा १७४
१५ मालेगाव मनपा ७२२ ४७
१६ अहमदनगर ७१
१७ अहमदनगर मनपा २१
१८ धुळे २९
१९ धुळे मनपा १००
२० जळगाव ३८५ ४७
२१ जळगाव मनपा १४१
२२ नंदूरबार ३२
नाशिक मंडळ एकूण १८२२ १२२
२३ पुणे ४५७
२४ पुणे मनपा ६०५० २८६
२५ पिंपरी चिंचवड मनपा ३८९
२६ सोलापूर ३१
२७ सोलापूर मनपा ६८० ५७
२८ सातारा ४२९ १६
पुणे मंडळ एकूण ८०३६ ३७६
२९ कोल्हापूर ३२२
३० कोल्हापूर मनपा २९
३१ सांगली ९०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग १९
३४ रत्नागिरी २०४
कोल्हापूर मंडळ एकूण ६७५
३५ औरंगाबाद २९
३६ औरंगाबाद मनपा १३४१ ५९
३७ जालना ८७
३८ हिंगोली १४३
३९ परभणी ३२
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण १६४० ६१
४१ लातूर ९८
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद ५४
४४ बीड ४१
४५ नांदेड २२
४६ नांदेड मनपा ८६
लातूर मंडळ एकूण ३१०
४७ अकोला ४२
४८ अकोला मनपा ४८७ २३
४९ अमरावती १६
५० अमरावती मनपा १८१ १२
५१ यवतमाळ ११६
५२ बुलढाणा ५५
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण ९०५ ४५
५४ नागपूर १०
५५ नागपूर मनपा ४८५
५६ वर्धा ११
५७ भंडारा २०
५८ गोंदिया ५१
५९ चंद्रपूर १६
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली २८
नागपूर एकूण ६३० १०
इतर राज्ये /देश ५४ १३
एकूण ५९५४६ १९८२

आज राज्यात मृत्यू झालेल्या ८५ रुग्णांपैकी मुंबई ३८, वसई विरार ४, ठाणे  ४, नवी मुंबई  २, रायगड  १,  जळगाव १, पुणे मनपा १०, सातारा ९, सोलापूर मनपा ७, औरंगाबाद ३, नांदेड मनपा १, अकोला मनपा ५ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६० पुरुष तर २५ महिला आहेत. ८५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४५ रुग्ण आहेत तर ३१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ९ जण ४० वर्षांखालील आहे. या ८५ रुग्णांपैकी ४५ जणांमध्ये ( ५३ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूपैकी ३७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे १५ मे ते २५ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ४८ मृत्यूंपैकी मुंबई २२, सोलापूर -५ , अकोला ४, औरंगाबाद ३, सातारा -३, ठाणे -३, वसई विरार -३, जळगाव -१, नांदेड -१, नवी मुंबई -१, पुणे -१ आणि रायगड येथील १ मृत्यू आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४,१९,४१७ नमुन्यांपैकी ५९,५४६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या कंटेनमेंट २८१६ झोन क्रियाशील असून आज एकूण १७,२११ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. सध्या राज्यात ६,१२,७४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५,१२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -