घरCORONA UPDATECoronavirus Update: आज राज्यात २६०८ कोरोना रुग्णांची नोंद; तर ६० जणांचा मृत्यू

Coronavirus Update: आज राज्यात २६०८ कोरोना रुग्णांची नोंद; तर ६० जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच जात आहे. लॉकडाऊन उठवण्यासाठी आता फक्त ७ दिवसच शिल्लक राहिले असताना रुग्णसंख्या काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. गेल्या २४ तासांत राज्यात २६०८ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ४७ हजार १९०वर गेली आहे. त्यासोबतच ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत १५७७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात ८२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या १३ हजार ४०४ झाली आहे. त्यामुळे ३१ तारखेनंतर राज्यातल्या काही भागांमध्ये लॉकडाऊ उठण्याविषयी संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची सविस्तर आकडेवारी

 

- Advertisement -
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       २८८१७ ९४९
ठाणे          ३९४
ठाणे मनपा २४०५ ३५
नवी मुंबई मनपा १८७८ २९
कल्याण डोंबवली मनपा ७८४
उल्हासनगर मनपा १४५
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
भिवंडी निजामपूर मनपा ८२
मीरा भाईंदर मनपा ४४२
पालघर १११
१० वसई विरार मनपा ४९९ १५
११ रायगड ३२१
१२ पनवेल मनपा २९५ १२
  ठाणे मंडळ एकूण ३६१७३ १०६९
१३ नाशिक ११५
१४ नाशिक मनपा १०५
१५ मालेगाव मनपा ७११ ४४
१६ अहमदनगर ५३
१७ अहमदनगर मनपा १९
१८ धुळे १७
१९ धुळे मनपा ८०
२० जळगाव २९० ३६
२१ जळगाव मनपा ११३
२२ नंदूरबार ३२
  नाशिक मंडळ एकूण १५३५ १०३
२३ पुणे ३१२
२४ पुणे मनपा ४८०५ २४५
२५ पिंपरी चिंचवड मनपा २३०
२६ सोलापूर २२
२७ सोलापूर मनपा ५४५ ३४
२८ सातारा २०४
  पुणे मंडळ एकूण ६११८ २९७
२९ कोल्हापूर २०६
३० कोल्हापूर मनपा २३
३१ सांगली ६३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग १०
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
३४ रत्नागिरी १४२
  कोल्हापूर मंडळ एकूण ४५५
३५ औरंगाबाद २२
३६ औरंगाबाद मनपा ११९७ ४२
३७ जालना ५४
३८ हिंगोली ११२
३९ परभणी १७
४० परभणी मनपा
  औरंगाबाद मंडळ एकूण १४०७ ४३
४१ लातूर ६४
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद २९
४४ बीड २६
४५ नांदेड १५
४६ नांदेड मनपा ८३
  लातूर मंडळ एकूण २२०
४७ अकोला ३१
४८ अकोला मनपा ३४२ १५
४९ अमरावती १३
५० अमरावती मनपा १४३ १२
५१ यवतमाळ ११३
५२ बुलढाणा ३९
५३ वाशिम
  अकोला मंडळ एकूण ६८९ ३४
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ४६२
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया ३९
५९ चंद्रपूर
अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली १३
  नागपूर एकूण ५४५
  इतर राज्ये /देश ४८ ११
  एकूण ४७१९० १५७७

 

राज्यात ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४०, पुण्यात १४, सोलापूरात २, वसई विरारमध्ये १, साता-यात १, ठाणे १ तर नांदेड शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील २४ तासातील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवडयातील आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४१ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये ( ६० %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १५७७ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -