घरमहाराष्ट्रऔरंगाबाद जिल्ह्यात १६६ रूग्णांची वाढ; एकूण ३२७ जणांचा कोरोनाने मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात १६६ रूग्णांची वाढ; एकूण ३२७ जणांचा कोरोनाने मृत्यू

Subscribe

कोरोना चाचणी करण्यात आलेल्या १ हजार ३ जणांच्या स्वॅबपैकी बुधवारी १६६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असून मुंबई पुण्यापाठोपाठ औरंगाबादमध्ये देखील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी सकाळी १६६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील ९९ तर ग्रामीण भागातील ६७ रुग्णांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये ९२ पुरूष तर ७४ महिलांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७ हजार ३०० कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहे. जिल्ह्यात एकूण ३२७ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार १४९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना चाचणी करण्यात आलेल्या १ हजार ३ जणांच्या स्वॅबपैकी बुधवारी १६६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या आणखी एका नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू

मनपा हद्दीतील आढळले ९९ रूग्ण 

हर्सुल जटवाडा रोड (१), मिल कॉर्नर (१), एन अकरा, हडको (५), सिडको (१), अमृतसाई प्लाजा (२१), भगतसिंग नगर (१), एन सहा सिडको (१), एन बारा, हडको, टीव्ही सेंटर (१), एकनाथ नगर (१), शहागंज (१), शिवाजी नगर (२), कटकट गेट (१), वसंत विहार (१), हुसेन कॉलनी (१), मारोती नगर (२), देवळाई (१), सातारागाव (१), चिकलठाणा (२), नंदनवन कॉलनी (१), राजेसंभाजी नगर (३), स्वराज नगर (१), उस्मानपुरा (१), जवाहर कॉलनी (१), पिसादेवी (१), समर्थ नगर (१), एन सात, आयोध्या नगर (१), हर्सुल (१), खोकडपुरा (३), पैठण गेट (१), शिवशंकर कॉलनी (४), पवन नगर (१), जाफर गेट (१), पद्मपुरा (१४), दशमेश नगर (१), गजानन नगर (२), रमा नगर (१), सुरेवाडी (१), जालान नगर (3), ज्योती नगर (१), छावणी (२), राम नगर (१), फुले चौक, औरंगपुरा (१), एसटी कॉलनी (१), जाधववाडी (३), टीव्ही सेंटर (२)

- Advertisement -

ग्रामीण भागात आढळलेले ६७ रूग्ण 

दत्त नगर, रांजणगाव (२), रांजणगाव (२), कराडी मोहल्ला, पैठण (१), वरूड काझी (१), सारोळा, कन्नड (१), श्रद्धा कॉलनी, वाळूज (१), अजिंठा (२०), वडगाव कोल्हाटी (१), सिडको बजाज नगर (१), वडगाव साईनगर, बजाज नगर (१), छत्रपती नगर, वडगाव (२), वडगाव, बजाज नगर (२), विश्व विजय सो., बजाज नगर (१), एकदंत सो., बजाज नगर (१), आनंद जनसागर, बजाज नगर (१), वळदगाव (१), सुवास्तू सो., बजाज नगर (१), सासवडे मेडिकल जवळ, बजाज नगर (६), तनवाणी शाळेजवळ,मुंडे चौक, बजाज नगर (4), साराकिर्ती, बजाज नगर (२), गणपती मंदिरासमोर, बजाज नगर (२), पाटोदा, बजाज नगर (२), वडगाव कोल्हाटी, संगम नगर, बजाज नगर (२), अन्य (१), बालाजी सो., बजाज नगर (४), लक्ष्मी नगर, पैठण (४), शिवशक्ती कॉलनी, वैजापूर (१) या भागात एकूण ६७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -