Corona: औरंगाबादमध्ये बळींची संख्या ५५४ वर

औरंगाबाद जिल्ह्यात ७४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ हजार ८२७ इतकी झाली आहे.

covid 19
कोरोना

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज, बुधवारी औरंगाबाद जिल्ह्यात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ५५४ झाली आहे. तर आज सकाळी आणखी ७४ नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार ८२७ झाली आहे. त्यापैकी १२ हजार ३४६ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या ३ हजार ९२७ बाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत.

पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

नारेगाव येथील ५८ आणि गारखेडा येथील ३२ वर्षीय दोन महिला, तर मुकुंदवाडी येथील ५८, बीड बायपास येथील ६२ आणि जयभवानी नगरातील ३३ वर्षीय तीन पुरूष अशा पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयांमध्ये मृत्यू झाला.

शहर परिसरातील नव्या बाधितांमध्ये एन-नऊ, सिडको येथील १, बनेवाडी ४, नगारखाना गल्ली २, अजबनगर १, प्रियदर्शनी कॉलनी, सिडको १, कांचनवाडी १, हिंदुस्तान आवास, कांचनवाडी २, श्रीकृष्ण नगर १, मिलिट्री हॉस्पीटल १, ध्यान मंदिर, नारळीबाग १, साईकृपा सोसायटी, बजरंग चौक, एन-सहा सिडको १, नाझलगाव १, घाटी परिसर १, एन-आठ, आझाद चौक १, गजानन नगर १, श्रेयनगर १, शिवाजीनगर २, जवाहर नगर परिसर ४, गुरूदत्त नगर १, हर्सूल टी पॉइंट १ गणेश कॉलनी १, सह्याद्री हिल १, न्याय नगर २, एन-दोन, पायलट बाबा नगर १, बालाजी नगर ३, गांधी नगर ४, नवयुग कॉलनी, भावसिंगपुरा १, राजीव गांधी नगर, मुकुंदवाडी ३, एन-चार सिडको १, खंडोबा मंदिराजवळ, सातारा परिसर ८ आदी ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे.

ग्रामीण भागात १९ बाधित

ग्रामीण भागातील नव्या बाधितांमध्ये करमाड येथील ३, गोपाळपूर १, वाळूज ४, पाचोड, पैठण १, बजाज नगर १, सारा वृंदावन सोसायटी, बजाज नगर १, देवगिरी सोसायटी, बजाज नगर २, छत्रपती नगर, वडगाव १, गोपीनाथ चौक, बजाज नगर १, पिशोर, कन्नड १, चित्तेगाव १, मेन रोड, ‍सिल्लोड १, तर पैठण येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.


हेही वाचा – पुण्यात कोरोनाचा कहर; बाधितांची संख्या ९६ हजार वर