घरCORONA UPDATECorona Live Update: कल्याण डोंबिवलीत आज ६२ रुग्णांची नोंद

Corona Live Update: कल्याण डोंबिवलीत आज ६२ रुग्णांची नोंद

Subscribe

कल्याण डोंबिवलीत आज ६२ रुग्णांची नोंद

कल्याण डोंबिवलीत बुधवारी एकाच दिवशी तब्बल ६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या २४ तासात ६२ नव्या रुग्णांची भर पडली असून या ६२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १ हजार २२९ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला तर ५८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ६१४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


भिवंडीत आढळले १९ नवे रुग्ण

भिवंडी शहरात १२ तर ग्रामीण भागात ७ असे १९ नवे रुग्ण आढळले आहेत. या १९ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३२१ वर पोहचला आहे.  भिवंडी शहरात बुधवारी १२ नवे रुग्ण आढळले असून आतापर्यंत शहरात ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील बाधीत रुग्णांचा आकडा १९७ वर पोहचला असून ८० रुग्ण बरे झाले असून १०६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

तर ग्रामीण भागात बुधवारी खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत २ , दिवा अंजुर येथे ४ तर अनगाव येथे एक असे ७ नवे रुग्ण आढळले आहेत. भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा आता ३२१ वर पोहचला असून त्यापैकी १३८ रुग्ण बरे झाले आहेत तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


मुंबईत आज ४९ जणांचा बळी

मुंबईत आतापर्यंत ४३ हजार २६२ कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी तब्बल ४९ जणांचा कोरोनाने बळी घेतला असून आतापर्यंत मृतांची संख्या १ हजार ४१७ वर पोहोचली आहे. आज दिवसभरात २५९ रूग्ण कोरोना आजाराने बरे झाले आहेत. दरम्यान आतापर्यंत मुंबईत ३३ हजारांहून अधिक रूग्णांना कोरोना संशयीत म्हणून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यापैकी आज ७९५ रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आले आहेत.

- Advertisement -

राज्यात १२२ जणांचा मृत्यू तर २५६० नवे रूग्ण

बुधवारी राज्यात २ हजार ५६० नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज ९९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३२ हजार ३२९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर राज्यात १२२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद देखील करण्यात आली आहे. दरम्यान राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार ८६० झाली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


धारावीत आज कोरोनाचे १९ नवे रुग्ण

आज मुंबईत धारावी भागात १९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. धारावीत आतापर्यंत एकूण १ हजार ८४९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून मृतांचा आकडा ७१ वर पोहोचला आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.


मंगोर हिल परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित

मंगोर हिल परिसरातील एका कुटुंबातील ६ व्यक्तींनी कोरोनाची चाचणी केली आणि त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या परिसराला कंटेंटमेंट झोन घोषित केले असून त्या क्षेत्रातील ४० व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून ते देखील पॉझिटिव्ह आहेत. दरम्यान हे लोकल ट्रांसमिशन असून कम्युनिटी ट्रान्समिशन नसल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.


दोन-तीन रुग्ण सिम्प्टोमॅटिक आणि इतर एसिम्प्टोमॅटिक

गोव्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या ६५ ते ७० अशी झाली आहे. दोन-तीन रुग्ण सिम्प्टोमॅटिक आणि इतर एसिम्प्टोमॅटिक आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.


‘मातोश्री’त कोरोनाचा शिरकाव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थाना बाहेरील चहावाला आणि सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र, आता या कोरोनाने ‘मातोश्री’मध्ये प्रवेश केला आहे. ‘मिडडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, मातोश्रीवरील कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, ठाकरे कुटुंब सुखरुप असले तरी देखील काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (सविस्तर वाचा)


Corona: केंद्रातील हालचालींना वेग; आठवड्याभरात कॅबिनेटची दुसऱ्यांदा बैठक

देशात कोरोनाबाधितांचा आकडा २ लाखांवर पोहोचला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ असताना आता केंद्रातील हालचालींनाही वेग आला आहे. एका आठवड्यात कॅबिनेटच्या मंत्र्यांची दुसऱ्यांदा बैठक होत असून काही महत्त्वाचे निर्यण घेण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोदी सरकारने आपल्या कार्यकाळाचे दोन टर्म काही दिवसांपूर्वीच पूर्ण केले आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी कॅबिनेट्या मंत्र्यांची एक बैठक पार पडली होती. यावेळी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच शेतकऱ्यांना कोरोनाच्या संकटापासून दिलासा देण्यात येईल, अशा काही घोषणा केंद्राकडून करण्यात आल्या.


कुर्ला पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकात असलेल्या ४८ वर्षीय पोलीस हवालदार यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. पोलीस हवालदार हे मागील एक वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यात त्यांना करोनाची बाधा झाली आणि त्यांचे आज निधन झाले. पोलीस हवालदार हे मुलुंड येथे राहण्यास होते.


संगीतकार वाजिद खानची आईही कोरोनाबाधित

बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद – वाजिदमधील वाजिद खान यांचा दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, काळजी घेण्यासाठी त्यांची आई सतत त्यांच्यासोबत रुग्णालयात होती. मात्र, आता त्यांची आई रजीना खान यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कुटुंबातील व्यक्तींनी मंगळवारी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, ‘रजीना खान यांना चेंबूर येथील सुराणा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.’ (सविस्तर वाचा)


पुणे : पाचव्या टप्प्यात आजपासून ‘या’ गोष्टी सुरु

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, पाचव्या टप्प्यात काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. पुणे शहरात देखील पाचव्या टप्प्यातील सवलती जाहीर करण्यात आल्या असून या टप्प्यात पुण्यातील उद्याने, कॅब, व्यापारी क्षेत्र, खाजगी कार्यालये, मंडई, बाजारपेठा असे तीन टप्प्यात सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नवीन आदेशात ६५ ऐवजी ६६ प्रतिबंधित क्षेत्र झाले आहेत. मात्र, अनेक वस्त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. (सविस्तर वाचा)


देशातील करोना रुग्णांची संख्या मंगळवारी दोन लाखांवर पोहोचली. त्यातील जवळपास एक लाख रुग्णांची नोंद गेल्या १५ दिवसांत झाली आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५० टक्के असून, इतर देशांच्या तुलनेत मृतांचे प्रमाण कमी आहे, असे केंद्रीय आरोग्य विभागाने म्हटले.

२४ तासांत ८,९०९रुग्ण

देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील २४ तासांत ८ हजार ९०९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ही वाढ कोरोनाबाधितांची आतापर्यंतची २४ तासातली सर्वाधित वाढ आहे. तर गेल्या २४ तासांत २१७ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ लाख ७ हजार ६१५ झाली आहे. त्यापैकी ५ हजार ८१५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ३०३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ४ हजार ७७६ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट ४८.३१ टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण १ लाख १ हजार ४९७ आहेत.


मुंबईत कोरोनाचे ११०९ नवे रुग्ण; ४९ मृत्यू

मुंबईमध्ये मंगळवारी ११०९ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ४१ हजार ९८६ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १३६८ वर पोहचला आहे. मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातात्याने वाढ होत असून, मंगळवारी कोरोना रुग्णांनी ४१ हजारांचा आकडा ओलांडला. मुंबईमध्ये मंगळवारी ४९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ४२ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३४ पुरुष तर १५ महिलांचा समावेश आहे.

मृतांमधील दोघांचे वय ४० वर्षांखाली आहे. २० जण हे ६० वर्षांवरील, तर २० जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.
मुंबईत कोरोनाचे ६८६ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ३२ हजार ४२५ वर पोहचली आहे. तसेच २२६ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १७ हजार २१३ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -