घरताज्या घडामोडीऔरंगाबाद शहरात पुन्हा लॉकडाऊन

औरंगाबाद शहरात पुन्हा लॉकडाऊन

Subscribe

औरंगाबाद शहर आणि वाळुंज परिसरात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

राज्यात एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असताना दुसरीकडे ‘मिशन बिगीन आगेन’ अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले आहे. अर्थचक्राला गती देण्याचा प्रयत्न सुरु असताना अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन केले जात आहे. भिवंडी, अंबरनाथ, ठाणे, मीरा भाईंदर, रत्नागिरी, नवी मुंबई या पाठोपाठ आता औरंगाबादमध्येही लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. औरंगाबाद शहर आणि वाळुंज परिसरात हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. येत्या १० ते १८ जुलै दरम्यान कडक निर्बंध लागू असणार आहेत.

१५० कोरोना रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी १५० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील १०२ रुग्ण तर ग्रामीण भागातील ४९ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये ८५ पुरूष तर ६५ महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ६ हजार ८८० कोरोनाबाधित आढळले आहेत.

- Advertisement -

तर त्यापैकी ३ हजार ३७४ रुग्ण बरे झालेले असून ३१० जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. या रूग्णांपैकी ३ हजार १९६ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना चाचणी करण्यात आलेल्या ९३४ स्वॅबपैकी आज १५० अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


हेही वाचा – ‘किस डे’निमित्त जाणून घ्या किसचे प्रकार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -