CoronaVirus: आता पेटीएमवर करा सिलेंडर बुक!

ग्राहकांना सहजरित्या सिलेंडर बुकिंग करता यावं आणि घरगुती सिलेंडर तुटवडा भासू नये याकरिता पेटीएमने इंडियन ऑइल कंपनीसोबत भागीदारी केली आहे.

coronavirus lockdown book lpg gas cylinder on paytm
CoronaVirus: आता पेटीएमवर करा सिलेंडर बुक!

करोनाच्या पार्श्वभूमीवर पेटीएम कंपनीने गृहिणीसाठी दिलासा देणार निर्णय घेतला आहे. आता पेटीएमवर सिलेंडर बुक करता येणार आहे. लॉकडाऊन दरम्यान घरगुती सिलेंडरचा तुटवडा भासू नये. तसंच सहजरित्या सिलेंडर बुक करणं शक्य व्हावं यासाठी पेटीएम कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यासाठी पेटीएमने इंडियन ऑइल कंपनीसोबत भागीदारी करून हा निर्णय घेतला आहे.

अशाप्रकारे पेटीएमवर सिलेंडर बुक करा

  • पहिल्यांदा पेटीएम अॅपमध्ये जाऊन Other Options क्लिक करायचे.
  • त्यानंतर बुक अ सिलेंडर या आयकोनवरती क्लिक करायचे.
  • मग त्यानंतर क्नजुमर नंबर टाकायचा.
  • गॅस एन्जसी आणि रजिस्टर मोबाईल नंबर अशी बेसिक माहिती द्यायची.

याव्यक्तिरित आता आयओसीएलचे घरपोच सिलेंडर पोहोचवणारे कर्मचारी देखील डिजिटल व्यवहाराला प्राधान्य देणार आहे. त्यामुळे त्यांनी पण पेटीएम ऑल-इन-वन अँड्रॉइड पीओएस डिव्हाइस आणि ऑल-इन-वन क्यूआर कोड सोबत ठेवतील. तसंच इंडियन ऑइलच्या सर्व कार्यालयांमध्ये या मशिन्स ठेवल्या जातील. कॅशलेश व्यवहार करण्याकरिता आणि ग्राहकांना सहजरित्या बुकिंग करता याव याकरिता भागीदारी करण्यात आली आहे.

याअगोदर जेव्हा राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते तेव्हा घरोघरी सिलेंडर आणून देण्याची सेवा बंद झाली.  त्यामुळे लोकांना ऑफिसजवळ येऊन गॅस सिलेंडर घेऊन जा, असे गॅस एजन्सीकडून सांगण्यात आले. त्यामुळे गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर गॅस सिलेंडर घेणाऱ्यांची रीघ लागली.  करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. मात्र, सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच राहतील, असे केंद्र आणि राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे. ती दुकानेही सुरू आहेत.


हेही वाचा – Corona Effect: मुंबईतील गोरगरिबांना देणार दाल खिचडी!