घरताज्या घडामोडीधक्कादायक! कुंकू लावलेल्या लिंबाचा प्रसाद खाऊन २० जणांना कोरोना

धक्कादायक! कुंकू लावलेल्या लिंबाचा प्रसाद खाऊन २० जणांना कोरोना

Subscribe

लिंबू आणि कुंकूचा प्रसाद खाऊन २० जणांना कोरोना झाल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे.

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका भोंदूबाबाने दिलेला लिंबू आणि कुंकूचा प्रसाद खाल्ल्याने तब्बल २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भोंदूबाबावर कडक कारावई करण्याची मागणी केली जात आहे.

नेमके काय घडले?

औसा तालुक्यातील सारोळा गावात अंधश्रद्धेचा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. देवीची परडी भरण्याच्या कार्यक्रमासाठी गावातील काही लोक एका आराद्याकडे गेले होते. हा आरादी गावाचाच रहिवासी असून तो एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आला होता. तरी देखील या आराद्याने लिंबू आणि कुंकूवावर फुंकर मारुन तो प्रसाद गावातील अनेकांना खायला दिला. त्यामुळे अनेकांनी या प्रसादाचे सेवन केले. त्यानंतर दोन दिवसांनी आजारी पडलेल्या आराद्याची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या आराद्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी करण्यात आली. त्यात २० जणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. धक्कादायकबाब म्हणजे हे २० ही लोक तीन कुटुंबातील असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी आराद्याविरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून या आराद्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. तसेच या घटनेनंतर या २० करोनाबाधितांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच हे २० जण गावातील कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेण्यात येत आहे.

लातूरमधील कोरोना रुग्णांची संख्या ४९३ वर गेली आहे. त्यापैकी २५२ जण कोरोनातून मुक्त झाले असून २१४ जणांवर उपचार सुरू आहेत. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने २७ जण दगावले आहेत. तर राज्यात मंगळवारी २२४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात मुंबईतील ६४ आणि पुण्यातील २७ रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा – म्हाडा सोडत विजेत्यांसाठी ‘ही’ आहे मोठी घोषणा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -