घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबई विमानतळावरील CISF च्या जवानांना कोरोनाची लागण

Corona Live Update: मुंबई विमानतळावरील CISF च्या जवानांना कोरोनाची लागण

Subscribe
मुंबई विमानतळावर काम करणाऱ्या सीआयएसएफच्या जवानांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे जवान पनवेल आणि कळंबोली येथे राहणारे होते.

 


मुंबईच्या धारावीत कोरोनाने शिरकाव

- Advertisement -

मुंबईच्या धारावीत कोरोनाने शिरकाव केला आहे. या रुग्णावर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरु असून ते ज्या ठिकाणी राहत आहेत ती इमारत देखील सील करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ही व्यक्ती कोणत्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आली याचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीचे कपड्याचे दुकान असल्याची माहिती देखील एका वृत्तवाहिनीने दिली आहे.


आता रेशनवर ५ किलो तांदूळ तीन महिने मोफत मिळणार

- Advertisement -

राज्यात एप्रिल, मे, जुन महिन्यांचे स्वस्त धान्य देण्याचा निर्णय १९ मार्चला अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला होता. दरम्यान केंद्र शासनाकडून नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रति व्यक्ती ५ किलो अतिरिक्त तांदुळ मोफत देण्याची अधिकृत सूचना प्राप्त झाली आहे

 


देशात लॉकडाऊनच्या काळात कोरोना व्हायरसचा सामना करत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी काही काळापुर्वी पत्रकार परिषद घेऊन देशातील सद्यस्थितीचा आढावा दिला. देशात एकूण १६३७ रुग्ण असून यापैकी ३८ जणांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.


 

02:01 PM – कोविड १९ इंडिया या वेबसाईटनुसार देशात आतापर्यंत ९९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार ७१८वर पोहोचली आहे. यापैकी ५२ जणांचा मृत्यू झाला आहे.


01:59 PM – कोरोनामुळे मुंबईतले १४६ भाग सील

कोरोनामुळे मुंबईतले १४६ भाग सील; सविस्तर यादी इथे वाचा!


01:55 PM – लॉकडाऊन दरम्यान स्वयंपाक घरातील LPG गॅस सिलेंडरच्या दरात घसरण झाली आहे. पंतप्रधान मोदींनी १४ एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन असल्याची घोषणा केली असल्याने लोकं घराबाहेर न पडता आपल्या घरात सुरक्षित राहून प्रतिसाद देत आहेत. दरम्यान कंपन्यांनी LPG गॅसच्या किंमतीत घसरण करून नागरिकांना दिलासा दिला आहे.

‘लॉकडाऊन’ दरम्यान LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत घसरण; सामान्यांना दिलासा


11:57 AM – राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढ असल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२० वरून ३२५वर पोहोचली आहे. राज्यात आज २३ नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईमध्ये १६ तर अहमदनगरमध्ये ५ आणि पुण्यात २ नवे रुग्ण आढळले आहेत.


10:12 AM –

आतापर्यंत देशभरातील कोरोनाची आकडेवारी

महाराष्ट्र – ३२०
केरळ – २४१
तमिळनाडू – १२४
दिल्ली – १२०
उत्तर प्रदेश – १०४
कर्नाटक – १०१
राजस्थान – ९३
तेलंगणा – ९२
मध्यप्रदेश – ८६
गुजरात – ७४
जम्मू-काश्मीर – ५५
आंध्रप्रदेश – ४४
हरयाणा – ४३
पंजाब – ४१
पश्चिम बंगाल – २७
बिहार – २१
चंदीगढ – १५
लडाख – १३
अंदमान-निकोबार – १०
छत्तीसगड – ९
उत्तराखंड – ७
गोवा – ५
ओडिसा – ४
हिमाचल प्रदेश – ३
आसाम – १
झारखंड – १
मनिपुर – १
मिझोरमा – १
पाँड्युचेरी – १
एकूण – १६५७


09.55 AM – रेल्वे पोलिसातील एका हेड कॉन्स्टेबलला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, त्याच्यासोबत संपर्कात आलेल्या इतर १५ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आलं असून त्यांची देखील कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे.


09:17 AM – दिल्लीमधील निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातीने धार्मिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात कोल्हापूरचे २१ जण सहभागी झाले होते. त्यामुळे या २१ जणांचा क्वारंटाईन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


08:34 AM –  राज्यातील कोरोनाची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाचा आकडा ३०२ वरून ३२०वर पोहोचला आहे. मुंबईत एकूण १६ नवे रुग्ण आढळले असून पुण्यात २ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०वर पोहोचली आहे.


08:08 AM –  राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. मुंबई आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. एका ७५ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना मुंबई एकूण नऊ तर राज्यात १३ जणांचा बळी गेला आहे.


08:04 AM –  डोंबिवलीतील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. ही मृत महिला ऑस्ट्रेलियाहून आली होती. तसंच तिच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान तिच्या मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या बळीचा आकडा आता १२वर पोहोचला आहे.


07:53 AM –  राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल एकाच दिवशी राज्यात ८२ करोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईत ५९ रुग्ण आढळले आहेतय त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३०२ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -