घरCORONA UPDATECorona Live Update: ७ वर्षाहून कमी शिक्षा असलेले ११ हजार कैदी मुक्त...

Corona Live Update: ७ वर्षाहून कमी शिक्षा असलेले ११ हजार कैदी मुक्त होणार..

Subscribe

राज्याच्या गृहविभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ६० तुरुगांतील जवळपास ११ हजार कैदांना तातडीने पारोल देण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

आतापर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झाला नव्हता. यापैकीच एक सिंधुदुर्ग जिल्हा होता. मात्र आता सिंधुदुर्गात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला आहे. कर्नाटकमधील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कणकवली येथील नागरिकाला करोनाची लागण झाली आहे.


राज्यातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

 


 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचे आज जाहीर केले. आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजभवनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी देखील आपले एक दिवसाचे वेतन करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे राजभवनाकडून आज जाहीर करण्यात आले.


राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात करोनाची लागण १२६ जणांना झाली आहे. या पाठोपाठ केरळमध्ये देखील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळमध्ये आतापर्यंत १०९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या देशातील करोना वाढता प्रसार पाहून संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसंच आतापर्यंत देशभरातील करोनाबाधितांचा आकडा ६०६वर पोहोचला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -