घरCORONA UPDATECoronaVirus Live Update: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ८०६८, २४ तासांत ४४० रुग्णांची...

CoronaVirus Live Update: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ८०६८, २४ तासांत ४४० रुग्णांची भर!

Subscribe
महाराष्ट्रातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८ हजार ६८ पर्यंत पोहोचली असून एकट्या मुंबईत ५ हजार ४०७ कोरोनाचे रुग्ण आहेत. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ४४० रुग्णांची भर पडली आहे तर १९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय राज्यभरात ११२ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आजपर्यंत बरे झालेल्यांचा आकडा ११८८वर जाऊन पोहोचला आहे.
https://twitter.com/ANI/status/1254410536969809922

भिवंडी शहर व ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून रविवारी शहरात दोन तर ग्रामीण भागात दोन असे चार नवे रुग्ण आढळले आहे. शहरात आज आढळलेल्या दोन नव्या रुग्णांमुळे भिवंडी शहरातील रुग्णसंख्या बारावर पोहचली होती. मात्र शहरातील अवचीत पाडा येथे बांद्राहून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची गणती मुंबईमध्ये करण्यात आल्याने शहरातील एक रुग्णसंख्या कमी झाली असून आता शहरातील एकूण रुग्णसंख्या ११ वर पोहोचली आहे. तर ग्रामीण भागातील दोन नव्या रुग्णांमुळे रुग्णांचा आकडा १० वर गेला आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णासंख्या आता २१ वर पोहचली आहे.

कल्याण डोंबिवली रविवारी नव्याने १२ रूग्णांची भर पडल्याने इथल्या करोनाबाधित रूग्णांची संख्या १२९ झाली आहे. नव्या रूग्णाांमध्ये डोंबिवलीतील आठ रूग्ण आणि कल्याणातील २ तर टिटवाळा येथे २ रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ४० रूग्णांना  डिस्चार्ज देण्यात आला असून ८६ रूग्ण हे विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. नव्याने आढळून आलेल्या रूग्णामध्ये कल्याण पूर्वेतील ४३ वर्षीय महिला ही मुंबईत आरोग्य कर्मचारी म्हणून काम करीत आहे तर कल्याण पश्चिमेत राहाणारा आणि मुंबईत पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. डोंबिवली आणि टिटवाळयातील रुग्ण करोनाबाधित रूग्णांच्या सहवासातील आहेत.

मावळणारा दिवस विचारतोय आज काय झाले आणि उगवणार दिवस विचारतोय काय होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाले. तसंच रमझान आणि अक्षय्यतृतीया निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी मुस्लिमांना नमाज अदा घरातून करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री आज लाईव्हमध्ये काय म्हणाले? 

  • कोरोनामुळे दोन पोलिसांचा मृत्यू झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हळहळ व्यक्त केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, डॉक्टर्स, पोलीस आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये देव असतो. त्यामुळे सर्व योद्धांचा आदर करा.
  • कोणत्याही प्रकारचे राजकारण न केल्यामुळे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना धन्यवाद मानले आहेत.
  • लॉकडाऊनला यश आलं आहे. लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांच्या संख्या गुणाकाराने वाढत नाही आहे.
  • लक्षणे दिसल्याबरोबर डॉक्टरांचा सल्ला द्या. घरच्या घरी उपचार करू नका. घरात व्यायाम करा, काळजी घ्या.
  • केंद्रीय पथ मुंबईत आल्यामुळे काही जण दाल में कुछ काला है असं म्हणतं आहे. याच संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, दाल में कुछ काला है नहीं है पहले राज्य में दाल आने दो.
  • आतापर्यंत १ लाखाहून अधिक जणांची कोरोना चाचणी झाली असून त्यापैकी १ लाखांहून अधिक जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
  • उद्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत.
  • विप्रो, रिलायन्स यांसारख्या कंपन्या आपल्यापरीने मदत करत आहेत.
  • आपला विश्वास, आपला आशीर्वाद हेच आमचे बळ आहे.

गर्दी करू नका, लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद राहणार – मुख्यमंत्री

- Advertisement -

कोरोनामुळे आणखीन एका पोलीसाचा मृत्यू झाल्याची दुःखत माहिती समोर आली आहे. मुंबईतील पोलीस हवालदार संदीप सुर्वे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते ५२ वर्षांचे होते.

- Advertisement -

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ११ वाजता मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या कोरोनाच्या लढ्यात प्रत्येकजण आपल्यापरीने नेतृत्व करत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसंच सामाजिक कार्यात पुढे आलेल्यांचे आभार मानले आहेत.

कोरोनाविरोधील लढ्यात कोव्हिड वॉरिअर्स बना, मोदींचे नागरिकांना आवाहन


जगातील कोरोनाचे संकट वाढत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या २९ लाखांहून अधिक झाली आहे. तर मृतांचा आकडा २ लाखांच्या वर पोहोचला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे ८ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

CoronaVirus: जगात कोरोनाचा हाहाकार: दोन लाखांहून अधिक जणांचा बळी!


देशातील गेल्या २४ तासांत १ हजार ९९० कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २६ हजार ४९६वर पोहोचला आहे. यामध्ये १९ हजार ८६८ रुग्ण अॅक्टिव्ह असून ५ हजार ८०४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.


जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा २६ लाखांहून अधिक आहे. तर कोरोनामुळे १ लाख ८३ हजारहून अधिक जणांचा बळी गेला आहे. सर्वाधित कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या अमेरिकेत गेल्या २४ तासांत २ हजार ४९४ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे अमेरिकेतील मृतांचा आकडा ५३ हजार ५११वर पोहोचला आहे. तसंच ९ लाख ३६ हजार २९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.


आज ११ वाजता पंतप्रधान नरेंद मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.

आज पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार


 लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढण्याची दाट शक्यता

राज्यातील लॉकडाऊनबाबत जरी ३ मे नंतर ग्रामीण भागाला दिलासा मिळू शकणार असला तरी मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्याला मात्र लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

मुंबई,ठाणे, पुण्यात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढणार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -