घरदेश-विदेशपंजाबमध्ये करोनाग्रस्ताचा मृत्यू देशात बळींची संख्या चार

पंजाबमध्ये करोनाग्रस्ताचा मृत्यू देशात बळींची संख्या चार

Subscribe

पंजाबमध्ये गुरुवारी एका करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात करोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या चारवर पोहोचली आहे. यापूर्वी दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रात करोनामुळे प्रत्येक एक बळी गेला आहे. देशात करोनाग्रस्तांची संख्या १७२ झाली असून त्यात महाराष्ट्रात ४९ जणांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

पंजाबच्या नवाशहर जिल्ह्यातील एका रुग्णालयात ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू करोना संक्रमणामुळे झाला. वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, हा व्यक्ती दोन आठवड्यांपूर्वी जर्मनीहून – इटली – भारत असा प्रवास करत मायदेशात दाखल झाला होता.

- Advertisement -

मृत व्यक्तीला मधुमेह तसंच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या व्यक्तीचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. वैद्यकीय अहवालानुसार, हा व्यक्ती करोना संक्रमित असल्याचे आढळले आहे. बुधवारी बांगा सामूहीक आरोग्य केंद्रात त्याचा मृत्यू झाला. देशात आत्तापर्यंत करोनाबाधित १७२ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये २५ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. करोनामुळे आत्तापर्यंत देशात चार जणांनी आपले प्राण गमावले असले तरी १४ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. उपचारानंतरदेखील या रुग्णांचा आढावा आरोग्य प्रशासनाकडून घेण्यात येत आहे.

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या करोना विषाणूच्या संक्रमणाने आत्तापर्यंत ९००० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत. भारतात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार हरएक प्रयत्न करताना दिसतंय. त्यामुळे, करोनाच्या भीतीने धास्तावलेले परदेशात असलेले भारतीयही मायदेशात परतण्याच्या प्रयत्नात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -