घरताज्या घडामोडीCoronaVirus: '२१ दिवस लॉकडाऊनचे पालन करून करोनाला हरवूया'

CoronaVirus: ‘२१ दिवस लॉकडाऊनचे पालन करून करोनाला हरवूया’

Subscribe

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशवासियांना संकल्प करायला सांगितला आहे.

आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी २१ दिवस लॉकडाऊनचे पालन करून करोनाला हरवूया असं आवाहन देशवासियांनी केलं. तसंच त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी करोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करूयात, असं भागवत म्हणाले.

सध्या जगात करोनाविरोधात युद्ध सुरू आहे. संपूर्ण जग करोना व्हायरसशी लढत आहे. काल रात्रीपासून देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे या लॉकडाऊनचे आणि सरकारच्या सर्व आदेशांचे पालन करा. केंद्र, राज्य सरकारला सहकार्य करा, असं आवाहन देखील मोहन भागवत यांनी केलं.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, करोना संसर्ग रोखण्यासाठी एकमेकांपासून लांब राहा. नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंग पाळवं. आपल्या परिवारसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि सर्वांनी एकजूट होऊन करोनावर मात करूया.

तसंच स्वयंसेवकांनी सरकारच्या परवानगीने मदतकार्य सुरू केलं आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे संघशाखा या वेगळ्या पद्धतीने भरवात येतील, असं मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

राज्यात करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत राज्यात करोनाचे १०७ रुग्ण आढळले आहेत. यापैकी १५ करोनाचे रुग्ण व्हायरस फ्री झाले आहेत. जगभरात आतापर्यंत ४ लाख २३ हजार ८६७ करोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १८ हजार ८७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच १ लाख ५ हजार ८३८ करोनाचे रुग्ण व्हायरस फ्री झाले आहेत.


हेही वाचा – Coronavirus – करोनामुळे जाऊ शकते तुमची नोकरी, कारण…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -