कॅन्टोन्मेंट नगरसेवकांना सहा महिने मुदतवाढ

Single day spike of 52,050 positive cases & 803 deaths in India in the last 24 hours
देशात २४ तासांत ५२ हजार ०५० नवे रुग्ण; तर ८०३ जणांचा मृत्यू

देशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीची मुदत संपल्याने नगरसेवक पदांसाठीच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या, परंतू कोरोना महामारीमुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने  केन्द्र सरकारने  बुधवारी(दि.५) विद्यमान  नगरसेवकांना पुन्हा एकदा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाची मुदत संपल्यानंतर नव्याने होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी  मोर्चे बांधणी सुरु केली होती, करोना महामारी मुळे लाॅकडाऊन सुरु झाल्यानंतर देशातील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या, देशभरात एकुण ६२ कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत, पैकी ५६ बोर्डातील नगरसेवकांची मुदत फेब्रुवारी महिन्यातच संपले आहे, दरम्यान वार्ड निहाय आरक्षण जाहिर झाल्याने काही मात्तबर नगरसेवकांना धक्का बसला होता, करोना परिस्थितीमुळे निवडणुका पुढे ढकलल्याने प्रशासक नेमण्याचीही चर्चा पुढे आली होती, यामुळे निवडणुकांबाबत साशंकता तयार झाली होती,

देवळाली कॅम्प भागात असणा-या सरकारी जागेवर व विनापरवानगी बांधकाम केलेल्या नागरिकांची सुमारे चार हजार मते वगळण्यात आली होती, यापैकी वार्ड क्रमांक सात मधील सर्वाधिक मतदार वगळण्यात आले होते, या विरुद्ध काही नगरसेवकांनी केन्द्रीय निवडणुक आयोगाकडे दाद मागितली आहे. बुधवारी केन्द्राने विद्यमान नगरसेवकांनाच सहा महिन्यांची मुदत वाढ देण्याचा आदेश काढल्याने हा आदेश नगरसेवकांच्या पथ्यावर पडला आहे.