घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणातील चूका आता दुरुस्त करा

मराठा आरक्षणातील चूका आता दुरुस्त करा

Subscribe

छत्रपती संभाजीराजेंचा सरकारला सल्ला

मराठा आरक्षण हा विषय गांभीर्याने घ्या. त्यातील बारकावे समजून घ्या, हे मी सरकारला नेहमी सांगितले आहे. जे कोणी सामान्य विभागाचे सचिव असतील त्यांनी याचा फॉलोअप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारला माझी विनंतीपूर्वक सूचना आहे की ताबडतोब जी चूक झाली ती दुरुस्त करा, अशी विनंती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे.

संभाजीराजे ‘टीव्ही ९ मराठी’या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, मी किती वेळा बोलायचे. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी होतो. मी गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरत आहे. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी करत आहे. मी आता बोलून बोलून थकलो आहे. पूर्णपणे थकून गेलो आहे. सरकारने ताबडतोब पावले उचलावीत. एवढीच विनंती असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.
सरकारी वकील कुठे आहेत? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाकडून केला जातो आणि तिथे वकील उपस्थित नसतात हे दुर्दैव आहे. गंभीर आहे. त्यामुळे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण जिथे कुठे असतील, त्यांनी कृपया कोऑर्डिनेट करण्याची गरज आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले. संभाजीराजे यांच्या या विनंतीनंतर अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने आणखी जोर लावायला पाहिजे म्हणजे काय करायचे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -