झोपडपट्टीतील किराणा दुकानांवर तंबाखू, सिगारेटसाठी गर्दी

झोपडपट्टीतील किराणा दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंबरोबरच तंबाखू व सिगारेट घेणारे मोठी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.

Mumbai
corona
करोना व्हायरस

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांकडून गर्दी केली जात असताना झोपडपट्टीतील किराणा दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंबरोबरच तंबाखू व सिगारेट घेणारे मोठी गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. ही दुकाने झोपडपट्टीतील आतील भागात असल्याने पोलिसांकडून यावर कारवाई होत नसल्याने मुंबईतील विविध ठिकाणच्या झोपडपट्यामंध्ये सर्रास सुरू आहेत.

झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या दुकानांमध्ये किराणा मालापासून शालेय साहित्यापर्यंत सर्व वस्तू मिळतात. त्यात अनेक दुकानेही झोपडपट्ट्यांच्या अंतर्गत भागात असल्याने बाहेर कशीही परिस्थिती असली तरी ती सुरू असतात. ही दुकाने झोपडपट्टीतील गल्ल्यांमध्ये असल्याने पोलीसही फारसे लक्ष देत नाहीत, त्यामुळे कोणतीही परिस्थिती असली तरी ही दुकाने बिनबोभाट सुरू असतात. करोनाच्या धर्तीवर राज्यामध्ये संचारबंदी लागू केली असताना अनेक झोपडपट्ट्यांमधील दुकाने सर्रासपणे सुरू आहेत. त्यामुळे या दुकानांवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात येत होती. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यानंतर झोपडपट्यामधील या दुकानांवर किराणा मालाबरोबरच तंबाखू, सिगारेट, पान मसाला घेणाऱयांची गर्दीत अधिकच भर पडली. लॉकडाऊन असल्याने अनेकजण 15 ते 20 तंबाखूची पाकिटे तर 10 ते 12 सिगारेटची पाकिटे एकावेळी नेत आहेत. तर काही जणांनी किलो किलोने सुट्टी तंबाखू विकत घेतली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंपेक्षा या दुकानांवर तंबाखू, सिगारेट, पान मसालाची विक्री या वस्तूंसाठीच अधिक गर्दी झाल्याचे दिसून आले.

किराणा मालापेक्षा तंबाखू, सिगारेट, पान मसालाची खरेदी करण्यासाठी लोक जास्त येत असल्याचे झोपडपट्टीतील एका किराणा मालाच्या दुकानदाराने सांगितले. तसेच आठवडाभरात लागणारे तंबाखू, सिगारेट, पान मसालाचा माल दोन दिवसांमध्ये संपल्याचेही त्याने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here