घरCORONA UPDATEजीवनावश्यक वस्तू वाटपात नगरसेवक आघाडीवरच

जीवनावश्यक वस्तू वाटपात नगरसेवक आघाडीवरच

Subscribe

अनेक बेघर, गरजू कुटुंबांना  व व्यक्तींना नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अनेक दात्यांचे हात पुढे आलेले असतानाच अनेकांनी तर गरीब कुटुंबांना जिवनाश्यक वस्तू मोफत पुरवठा करण्याची जबाबदारी उचलली आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सर्व कंपन्या, दुकाने बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या अनेक गरीब व गरजू कुटुंबांची परवड होत आहे. त्यामुळे अनेक बेघर, गरजू कुटुंबांना  व व्यक्तींना नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अनेक दात्यांचे हात पुढे आलेले असतानाच अनेकांनी तर गरीब कुटुंबांना जिवनाश्यक वस्तू मोफत पुरवठा करण्याची जबाबदारी उचलली आहे. यामध्ये विशेष करून नगरसेवक आघाडीवर आहेत.

‘कोरोना’मुळे हातावर पोट असलेल्या दिव्यांगांना तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना  दहिसरमधील प्रभाग क्रमांक ३चे शिवसेना नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी यशोधन फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचा पुरवठा करत आहेत. आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते अनेक कुटुंबांना त्यांनी या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.

- Advertisement -

तर भाजपच्या नगरसेविका जागृती पाटील यांनी भांडुपमध्ये तर भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी गोरेगावमध्ये गरीब व गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. शिवसेना नगरसेविका तेजस्वी अभिषेक  घोसाळकर यांनी दहिसर गणपत पाटील नगर येथील गरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष व शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावतीने हा जीवनावश्यक वस्तुंच्या वाटपाचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. तर शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यावतीनेही धारावी, अणुशक्तीनगर परिसरांमधील गरीब व गरजु कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपाचे कार्य हाती घेतले आहे. त्यामुळे अनेक गरीब व गरजू लोकांना  या जीवनावश्यक वस्तूंमुळे मोठा दिलासा मिळालेला आहे.

नगरसेवकांच्या माध्यमातून स्वस्त दरात भाजीची सुविधा

राज्यातील अनेक भागांमधून भाजीपाल्याचे ट्रक कमी प्रमाणात येत असल्यामुळे तसेच बाजारांमधील भाजींची आवक कमी झाल्यामुळे अनेक भागांमध्ये भाज्यांचे दर प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक नगरसेवकांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून थेट विभागांमध्ये स्वस्त दरात भाजी विक्रीची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. महापालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले यांनी वडाळ्यात सहकार नगर येथे तर भाजपच्या नगरसेविका शीतल गंभीर यांनी माहिम- माटुंगा पश्चिम परिसरांमध्ये स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध करून दिलेला आहे. याशिवाय भांडुपमध्ये जागृती पाटील, अंधेरी एमआयडीसी परिसरात काँग्रेसचे नगरसेवक नीतीन सलागरे, भांडुपमध्ये भाजपच्या सारिका पवार आदी नगरसेवकांनी विभागातील जनतेला स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -