घरताज्या घडामोडीसांगलीत कोरोनाबाधित वृद्धेचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू

सांगलीत कोरोनाबाधित वृद्धेचा उपचाराअभावी तडफडून मृत्यू

Subscribe

उपचाराअभावी एका ८० वर्षाच्या वृद्ध महिलेचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. एककडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तर दुसरीकडे अनेक व्यक्तींचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. नुकतीच सांगलीत एक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका ८० वर्षीय कोरोनाबाधित वृद्धेचा खाट न मिळाल्याने उपचाराअभावी मृत्यू झाला आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी घडल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

सांगलीतील एका ८० वर्षीय वृद्ध महिला तीन दिवसांपूर्वी अचानक अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करत त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. दरम्यान, बुधवारी सकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांचा नातू शैलेश कोरे याने रुग्णवाहिकेची शोधाशोध सुरू केली. रुग्णवाहिका मिळत नसल्याने आजीला स्वतःच्या कारमध्ये घेऊन तो घराबाहेर पडला. सांगली आणि मिरजेतील सर्व कोविड उपचार सेंटरवर गेला. मात्र, त्याला खाटा शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्याने अनेक खासगी रुग्णालये पालथी घातली. रात्रभर तो सांगली आणि मिरजेतील रुग्णालयांमध्ये जाऊन विनवण्या करत होता. मात्र, एकाही रुग्णालयात त्याला प्रवेश मिळाला नाही. खाटा शिल्लक नाहीत, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही, ऑक्सिजनची व्यवस्था नाही, अशी एकना अनेक कारणे सांगून रुग्णालयांनी आजीला दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली.

- Advertisement -

दरम्यान, आजीची तब्येत अधिकच खालावत गेली. आजीसा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अखेर उपचाराअभावी तडफडणाऱ्या आजीचा गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कारमध्येच तडफडून मृत्यू झाला. या घटनेने हतबल झालेला नातू शैलेश कोरे याने त्याला आलेले अनुभव व्हिडिओद्वारे सांगितले आहेत. त्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहे.


हेही वाचा – काही तासांतच अनिल डिग्गीकर यांची दुसऱ्यांदा बदली; तर प्रवीण दराडेंची उचलबांगडी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -