अजिंक्य रहाणे या एकमेव क्रिकेटपटूची पूरग्रस्तांना मदत

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सामाजिक बांधिलकी जपत सांगली-कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे.

Mumbai
ajinkya-rahane
क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे

कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी अनेक पातळीवर मदतीचे हात पुढे येत आहेत. असे असले तरी अद्याप येथील नामवंत क्रिकेटपटू, बॉलिवूडकरांनी मात्र राज्यावर ओढावलेल्या या संकटाकडे दुर्लक्ष केले आहे. या परिस्थितीत भारताचा आघाडीचा फलंदाज अजिंक्य रहाणे यांनी सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. मदत करून तो थांबलेला नाही. अजिंक्यने सामाजिक भान जपत इतरांनाही पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन सोशल मिडीयातून केले आहे.

काय म्हणाला अजिंक्य?

अजिंक्य रहाणेने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ट्वीट केले आहे. त्यामध्ये अजिंक्यने म्हटले आहे की, ”आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा.”

हेही वाचा – पूरग्रस्तांना मदत न करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना मनसेचा धोबीपछाड

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here