घरमहाराष्ट्रगुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डी, अक्कलकोट, शेगांवात भाविकांची अलोट गर्दी

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डी, अक्कलकोट, शेगांवात भाविकांची अलोट गर्दी

Subscribe

गुरुपौर्णिमा निमित्ताने शिर्डी, अक्कलकोट आणि शेगांवात हजारो भाविकांनी गर्दी केली आहे. शिर्डीत गर्दीमुळे VIP पास प्रवेश बंद करण्यात आला आहे.

गुरुपौर्णिमा निमित्ताने आज सकाळपासून शिर्डी, अक्कलकोट आणि शेगांवात भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. आज सकाळपासून शिर्डीत गर्दी पाहायला मिळत आहे. सकाळी काकड आरतीसोबत अनेक भाविकांनी साई बाबांचे दर्शन घेतले. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने साई बाबांच्या अनेक पालख्या ढोल, ताशांच्या गजरात शिर्डीत दाखल झाल्या आहेत. या उत्सवाच्या निमित्ताने साईसंस्थेने जोरदार तयारी केली आहे. साई समाधी मंदिर, गुरुस्थान आणि द्वारकामाई आकर्षकपणे सजवण्यात आले आहे. शिर्डीप्रमाणे अक्कलकोट आणि शेगांवातही भाविकांनी गर्दी केली आहे.

शिर्डीत VIP पास एन्ट्री बंद

शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी वाढत आहे. शेकडो पालख्या, पदयात्रा शिर्डीला पोहोचत आहेत. सर्व भक्तांना साईबाबांच्या दर्शनाची ओढ लागली आहे. त्यामुळे साईसंस्थेने व्हिआयपी पास एन्ट्री बंद केली आहे. साईभक्तांना दर्शन मिळावे, याची पुरेपुर काळजी मंदिर प्रशासनाकडून घेतली जात आहे. यासोबतच अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या आणि शेगावात गजानन महाराजांच्या दर्शनासाठी हजारो नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

- Advertisement -

आज खंडग्रास चंद्रग्रहनही

आज गुरु पौर्णिमा आणि खंडग्रास चंद्रग्रहन एकाच दिवशी आले आहे. मंगळवारी रात्री १.३१ वाजता ग्रहन सुरु होईल. तर पहाटे ४.२९ वाजता हे ग्रहन संपेल, अशी शक्यता खगोल शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.


हेही वाचा – बिन गुरू ग्यान कहाँ से पाऊ!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -