घरमहाराष्ट्रकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये १५ जुलैपर्यंत कर्फ्यू

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये १५ जुलैपर्यंत कर्फ्यू

Subscribe

प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये आणि घरापासून दोन किलोमीटरच्या परिघात असलेल्या दुकानातूनच आवश्यक वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

कोविड -१९ या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या अनावश्यक हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी औरंगाबाद शहरातील पोलिसांनी संध्याकाळी ७ ते पहाटे ५ पर्यंत कर्फ्यू लावला आहे. पोलिस आयुक्तांनी गुरुवारी जारी केलेल्या आदेशानुसार कर्फ्यू दरम्यान केवळ वैद्यकीय सेवा आणि उद्योगांशी संबंधित वाहनांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

वारंवार आवाहन करून देखील नागरिक कोणत्याही नियमांचे पालन न करता रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरताना, रस्त्यावर गप्पा मारताना दिसत असल्याने हा संचारबंदीचा कालावधी वाढवून १५ जुलैपर्यंत केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये आणि घरापासून दोन किलोमीटरच्या परिघात असलेल्या दुकानातूनच आवश्यक वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा आदेश शुक्रवारपासून अंमलात आला असून १५ जुलैपर्यंत तो लागू राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे २०० नवीन रुग्ण आढल्यानंतर या भागात लागण झालेल्या लोकांची संख्या ६ हजार २४३ वर पोहोचल्याचे एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, शहरात सध्या २ हजार ९९५ लोकांवर उपचार सुरू आहेत, तर २ हजार ९६९ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


मुंबईत १५ जुलैपर्यंत रात्रीची संचारबंदी जाहीर!


संपुर्ण जिल्ह्यात या कोरोनामुळे आतापर्यंत किमान २७९ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना कोरोनापासून वाचविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लातूर जिल्ह्यातील प्रशासनाने सांगितले की, लॉकडाऊन होईपर्यंत ज्यांच्या दुकानात मालक किंवा कामगार वृद्ध असतील त्यांची दुकानं बंद केले जातील. जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी गुरुवारी जारी केलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील कोविड -१९ मध्ये मृत्यू झालेल्या बहुतेक लोक वयोवृद्ध रुग्ण असलेल्याचे समोर आले आहेत.

- Advertisement -

या संचारबंदीत विनाकारण वावरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात होती, मात्र रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता पोलिसांनी संध्याकाळी ७ वाजेपासून संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -