घरCORONA UPDATEपंढरपूरमध्ये २ जुलैपर्यंत संचारबंदी लागू

पंढरपूरमध्ये २ जुलैपर्यंत संचारबंदी लागू

Subscribe

पंढरपूरमध्ये उद्या, ३० जून दुपारी दोन वाजल्यापासून २ जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. वारी काळात शहरात गर्दी होवू नये यासाठी अडीच दिवसांचा संचारबंदी लागू करण्यात आला आहे. २ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू झाली आहे. पंढरपूरच्या शहर व परिसरातील १० किलोमीटर परिसरात हा नियम लागू झाला आहे.

हेही वाचा – २५ दिवसांत ५ लाख परप्रांतीय मुंबईत परतले!

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी पंढरपूर शहरात २९ जून ते २ जुलै अशी चार दिवसांची संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव दिला होती. त्यावर वारकरी आणि पंढरपुरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत संचारबंदीचा कालावधी कमी करावा, असी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानंतर पोलीस प्रशासनाने नव्याने अडीच दिवसांचा प्रस्ताव पाठवला. नव्या प्रस्तावामध्ये संचारबंदी लागू करण्यात यावी, असा प्रस्ताव पाठवला होता.

दरम्यान, आषाढी एकादशीची वारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व आरोग्य व्यवस्था पाहणी करता गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूरला शनिवारी भेट दिली. महाद्वार चौकातून दर्शन घेताना गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाला साकडं घातलं “विठू माऊली तू माऊली जगाची, आर्त साद तुज ही कोरोना मुक्तीची’, असे म्हणत विठुरायाला साकडं घातलं. ‘संपूर्ण जग, भारत आणि महाराष्ट्रातून या कोरोनाला घालव आणि शतकांपासून चालत आलेली वारीची परंपरा पूर्ववत लवकरच चालू होण्यासाठी आशिर्वाद असू द्या’, असे म्हणत विठुरायाला नमस्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके आदि उपस्थित होते. यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगबाबत उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -